Tag: हिमायतनगर

गणेशवाडीतील विद्यार्थिनी राधिका टारपे हिची पोलीस भरतीत निवड

गणेशवाडीतील विद्यार्थिनी राधिका टारपे हिची पोलीस भरतीत निवड

करियर
किनवट/हिमायतनगर| गट ग्रामपंचायत जिरोणा अंतर्गत गणेशवाडी येथील विद्यार्थिनी कु. राधिका शाम टारपे हिची पोलीस भरतीत निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राधिका हिने मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी जिरोणा येथील पोलीस पाटील प्रतिनिधी गंगाधर मिराशे तसेच जाधव अकॅडमी, गोकुंदा (किनवट) यांच्या वतीने तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या कुटुंबीयांमध्ये व गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे....
हिमायतनगर तालुक्यात वादळ-वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पिके व घरांचे मोठे नुकसान

हिमायतनगर तालुक्यात वादळ-वाऱ्यासह पावसाचा तडाखा; पिके व घरांचे मोठे नुकसान

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात रविवारी रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे व पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांतील घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, काही ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (पश्चिम) परिसरात वादळाचा फटका अधिक बसला. गावातील अनेक कुटुंबांचे निवारे उद्ध्वस्त झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. यात हळद, उन्हाळी ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा,चिकू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मुक्या जनवारांसाठी जमून ठेवलेल वैरण देखील वादळी वाऱ्याने उडून गेल्यानं मोठं नुकसान झालं आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टिन पत्रे उडून गेल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहेत. काही ठिका...
हिमायतनगर रेल्वे स्थानक विकासावर प्रश्नचिन्ह; प्रवासी त्रस्त, प्रशासन मात्र उदासीन

हिमायतनगर रेल्वे स्थानक विकासावर प्रश्नचिन्ह; प्रवासी त्रस्त, प्रशासन मात्र उदासीन

तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. स्थानकावरील दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अद्याप डिजिटल कोच पोझिशन डिस्प्ले बसवलेले नाहीत. परिणामी, गाड्या नेमक्या कुठे थांबणार याची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. https://www.youtube.com/shorts/X0AEtMA2f28 पहिल्या प्लॅटफॉर्मवर केवळ जुने बांधकाम रंगरंगोटी करून नव्यासारखे दाखवले जात आहे, तर प्रत्यक्षात दुरुस्तीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. छतामधून गळती होत असून एका बाजूला पाण्याची कमतरता तर दुसऱ्या बाजूला नळांमधून प...
हिमायतनगरच्या कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवा; अपघाताचा धोका टाळा – मुख्याध्यापकांची मागणी

हिमायतनगरच्या कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवा; अपघाताचा धोका टाळा – मुख्याध्यापकांची मागणी

सामाजिक
अन्यथा सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन छेडावे लागेल - रामभाऊ सूर्यवंशी हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेसमोर वाढत्या वाहतूक वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी शाळेसमोर तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी मुख्याध्यापकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर शाळेत एकूण ५९१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळा दोन सत्रांत भरवली जाते. दुपारी १२ वाजता पहिले सत्र सुटताच सुमारे ३०० विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडतात, तर त्याच वेळी दुसऱ्या सत्रातील २९१ विद्यार्थी शाळेत प्रवेश करतात. त्यामुळे शाळा परिसरात मोठी गर्दी होत असून रस्ता कायमच वर्दळीचा असतो. या ठिकाणी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने विद्यार्थ्यांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वीही काही विद्यार...
श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन

श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| वाढोणा ( हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही शोभायात्रा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बाजार चौकातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन सर्व साधू-संत व माय-माऊलीच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत भजन व विविध धार्मिक सादरीकरणे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. विशेषतः प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गौमाता राष्ट्रमाता यांच्या झांक्यांमुळे मिरवणूक अधिक आकर्षक ठरणार आहे. तसेच भजन सम्राट विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) यांचे भजन सादरीकरण आणि रिध्दम लाईव्ह ...
कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

आरोग्य
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने कामारी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, कामारी येथे पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, उपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध वितरणाचीही सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी मुरलीधर उमाटे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता) – 9921112903, आमदार बाबुराव कदम कोहळीकर सं...
हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

सामाजिक
हिमायतनगर|  हिमायतनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता परमेश्वर मंदिराजवळ, बस स्टँड परिसरात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पहिले सत्र (सायं. ४ वाजता): या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन पाटील (समाज व विचार मंच) राहणार असून उद्घाटन माजी आमदार माधवराव कदम कोळीकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे उपस्थित राहणार आहेत. दुसरे सत्र (सायं. ६.३० वाजता): या सत्राचे अध्यक्ष मधुसूदन क...
हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

हिमायतनगर शहरासह कारला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

धर्म अध्यात्म
हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, विविध संस्था, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालये तसेच बौद्ध विहारांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष शेख रफिकभाई व नगरसेवकांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी नारवटकर, पांचाळ, स्वप्निल भद्रे, भौरे, भिसे आदींनी अभिवादन केले. तसेच तहसील कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयांतही जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील तक्षशिला बौद्ध विहारातही जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम...
हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

हिमायतनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; शोभायात्रा, भीमगीतांतून अभिवादन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरासह तालुकाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढत अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध चौकांमध्ये मान्यवरांनी भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. महिला-पुरुष, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता पंचशील ध्वजारोहणानंतर नालंदा बौद्ध विहारात सामुदायिक पंचशील व त्रिशरण ग्रहण करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांवरून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेदरम्यान शालेय विद्यार्थी व युवकांनी...
हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्म अध्यात्म
स्वामी समर्थ केंद्रात धार्मिक वातावरण; १५ एप्रिल रोजी महाआरतीने होणार समारोप https://www.youtube.com/shorts/9MOGm3ssZhg हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेल्या अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध पूजाअर्चा, अखंड नामजप यज्ञ, पारायण आणि हवन विधी सुरू आहेत. या सप्ताहात गुरुचरित्र पारायण, वीणा पारायण, अखंड नामजप यज्ञ, देवी-देवतांची सेवा तसेच खंडोबाची सेवा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा आरती केली जात असून, यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भारत देशात शांतता नांदावी, देशाची सुरक्षा अबाधित राहावी तसेच युद्धजन्य परिस्थिती टळावी, या उद्देशाने हा धार्मिक उपक्रम राबवण्यात ये...
error: Content is protected !!