नांदेड पतंजली योगपीठ परिवारातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

संकल्प यज्ञातून योग विस्ताराचा निर्धार; कैलास नगर हनुमान मंदिर परिसरात ध्वजारोहण

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड पतंजली योगपीठ परिवाराच्या वतीने कैलास नगर येथील हनुमान मंदिर परिसरात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी योगसाधना, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्वांच्या उपस्थितीत संकल्प यज्ञाने करण्यात आली. प्रत्येक वार्ड व नगर परिसरात नि:शुल्क योग शिबिरे आयोजित करणे, योगाचा अधिकाधिक विस्तार करणे तसेच योगसाधना घरोघरी पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

या प्रसंगी पतंजली योगपीठ परिवाराचे कार्यकर्ते, योगसाधक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अनिल अमृतवार, पंढरीनाथ कंठेवाड, दत्तात्रय काळे, राम शिवपनोर, शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिव बुटले पाटील, शिवाजी पेन्सलवार, हनुमंत ढगे, निळकंठ जाधव, तुळशीराम केरले, किरण मुत्तेपवार, व्यंकटेश कोटगिरे, सुरेश गोजे, देवेश सलगरकर, जनार्धन आठवले, भारत टेकाळे, भगवान कल्याणकर, राजेंद्र शंकरपुरे, नंदकिशोर गबाळे, दिलीप तिडके, शंकर स्वामी, हरिहर नरवाडे, किशन भवर, अशोक पुंडगे, नारायण कुलकर्णी, यश पानपट्टे, पंडित पाटील, दिगंबर पाटील, सोपान काळे, अशोक नातेवाड, निवृत्ती रायमुळे, ईश्वर सुरजुसे, राघव दंडे, रामदास पेंडकर, सुभाष जाधव, श्रीरंग मोरे, भारत मोरे,

विनोद पाटील, शंकर परकंटे, नामदेव मोहिते, सुमित कोटगिरे, राजू जोशी, माधव पचलिंग, राजू शेट्टे, दिलीप आघाव, व्यंकट कल्याणपाड, माधवराव पाटील, शैलेंद्र नावडे, बापूराव मोरे, शामराव कोरडे, मनोज राठोड, अनिल कदम, अशोक कुरुडे, बालाजी कहाळेकर, भुमन्ना चिंतावार, बालाजी वारकड, संजय चिंचोलकर यांच्यासह महिला योगसाधकांमध्ये नंदिनी चौधरी, सविता गबाळे, उर्मिला साजने, सुनिता आघाव, सुरेखा घोगरे, स्वाती बेंबरे, सुनंदा बंडे, अर्चना हाडोळीकर, अश्विनी चित्तकेशिवार, भाग्यलक्ष्मी गुंडाप्पा, लक्ष्मीबाई नागेश्वर, सारोजनी गड्डम, जानकी कोलमपल्ली, संगीता पासलवाड, रेखाताई कुंबालकर, सरोजनी गोपीवार, ललिता रायभोळे, शोभा कांबळे, कल्पना नहारे, सुजाता ढगे, गंगासागर करले, इंदुताई जोंधळे, प्रतिभा पाटील, प्रभावती करडे, सुनिता डांगे, मंगला पाटील, श्यामा मालपाणी, सीमा शिकवाल, मंगला तोडकर, पार्वतीबाई, ज्योती गिल्ड्डा, दर्शन जैन, सुनिता देशमुख, ताराबाई दळवी, छायाबाई शिरफुले, जयश्री पेन्सलवार, पद्माबाई उपकर, अनिता सोनटक्के, तृप्ती वानखेडे आदींची उपस्थिती होती.

योगाचा प्रसार, निरोगी समाज आणि राष्ट्रसेवेचा संकल्प करत स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला, अशी माहिती पतंजली योग परिवाराच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!