आरोग्य

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अनोळखी निराधार रुग्णाला मिळाला मायेचा आधार

अनोळखी निराधार रुग्णाला मिळाला मायेचा आधार

आरोग्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयातून मदर तेरेसा शांतिनिकेतनमध्ये पुनर्वसन नांदेड| उपचारानंतर अनोळखी व निराधार रुग्णाला सुरक्षित निवारा, काळजी आणि आधार मिळवून देत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील औषधवैद्यकशास्त्र विभागाने माणुसकीचा संवेदनशील परिचय दिला. सुमारे ६० वर्षीय रुग्णाचे मदर तेरेसा होम शांतिनिकेतन, मालटेकडी येथे सुरक्षितपणे पुनर्वसन करण्यात आले. सदर रुग्णास ८ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथून १०८ रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या कक्ष क्रमांक ३४ मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बेरुळा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी औंढा नागनाथ पोलीस ठ...
किनवट येथे १ ऑक्टोबरला भव्य मोफत आरोग्य महाशिबिर

किनवट येथे १ ऑक्टोबरला भव्य मोफत आरोग्य महाशिबिर

आरोग्य
मोतीबिंदू, श्रवणदोष, दात, रक्तदाब व रक्तातील साखरेची होणार तपासणी; गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन किनवट, प्रतिनिधी| गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने श्री साईकृपा विश्वस्त मंडळाच्या वतीने गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री नर्मदेश्वर महादेव बारा ज्योतिर्लिंग साईबाबा मंदिर, किनवट येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी व मार्गदर्शन, कमी ऐकू येणे अथवा श्रवणासंबंधी तक्रारींची तपासणी, दातांची तपासणी, रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व पुढील उपचाराबाबत सल्ला दिला जाणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असू...
५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय ‘एडीबी’च्या अर्थसाहाय्याने उभारण्यास मंजुरी

५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय ‘एडीबी’च्या अर्थसाहाय्याने उभारण्यास मंजुरी

आरोग्य
राज्य सरकारचा मोठा निर्णय; खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड| राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'प्रगती' प्रकल्पाअंतर्गत नांदेड येथे आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मागील दोन वर्षांपासून या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार व मोफत उपचार उपलब्ध करून देणे, हा या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचा मुख्य उद्देश आहे. या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी मंजूर आकृतीबंधानुसार सर्व ५९४ पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून, या नवनिर्मित पदांच्या वेतनासाठी ३१.२५ कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात ...
युवा सेनेतर्फे देगलूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २०० जणांची तपासणी, १०० जणांना चष्मे वाटप

युवा सेनेतर्फे देगलूरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २०० जणांची तपासणी, १०० जणांना चष्मे वाटप

आरोग्य
देगलूर, गंगाधर मठवाले| युवा सेना शहरप्रमुख विनोद लक्ष्मणराव सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत युवा सेनेच्या वतीने देगलूर येथे मोफत नेत्ररोग, दंतरोग तसेच नाक-कान-घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री संत रविदास महाराज सभागृहात आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २०० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर जवळपास १०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. गोरगरीब, दिनदलित, वृद्ध माता-भगिनी व गरजू नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आणि पूजा आहे, या भावनेतून युवा सेना तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख राहुल सोनकांबळे तडखेलकर मित्रमंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन श्री संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले. यावेळी देगलूर येथील सुप...
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप; १२२ शिबिरांत १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप; १२२ शिबिरांत १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य
नांदेड | महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या समन्वयाने जिल्हाभर आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप झाला. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात आयोजित १२२ शिबिरांमध्ये १३ हजार ६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३ हजार १२१ आयुष्मान भारत व आभा कार्डांची नोंदणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला. नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकु...
कोट्यवधींच्या नाल्यांचा भोंगळ कारभार उघड; अल्प पावसातच घाण पाणी वस्तीत, महामार्ग विभागाविरोधात संताप!

कोट्यवधींच्या नाल्यांचा भोंगळ कारभार उघड; अल्प पावसातच घाण पाणी वस्तीत, महामार्ग विभागाविरोधात संताप!

आरोग्य, सामाजिक
हिमायतनगर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या धानोडा भोकर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील कथित निकृष्ट दर्जाचा कारभार आता नागरिकांच्या आरोग्यावर बेतू लागला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नाले अल्पशा पावसातच फेल ठरत असून, नाल्यांतील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट शहरातील सखल वस्त्यांमध्ये घुसत आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेसह गंभीर आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत आहे. शहराच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पाण्याचा उतार, नैसर्गिक प्रवाह आणि जलनिस्सारणाचा कोणताही शास्त्रीय विचार न करता मनमानी पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते उलट वस्त्यांमध्ये साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याच निकृष्ट कामाविरो...
२२ ते २८ जुलैदरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

२२ ते २८ जुलैदरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

आरोग्य
रक्तदानासह विविध मोफत आरोग्य तपासण्या; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी रक्तदान व महाआरोग्य शिबिर अभियानाचे आयोजन २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष मुंबईचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांचे वेळापत्रक  - रक्तदान शिबिर : २२ ते २८ जुलै — रक्तपेढी (ब्लड बँक), स्तन कर्करोग तपासणी : २२ ते २४ जुलै — ओपीडी क्र....
शासकीय कार्यक्रमात जखमी झालेल्या दिव्यांग युवकाला न्याय कधी?; मदत व पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे निवेदन

शासकीय कार्यक्रमात जखमी झालेल्या दिव्यांग युवकाला न्याय कधी?; मदत व पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे निवेदन

तेलंगणा, आरोग्य
नांदेड | नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे २६ जून रोजी आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान प्रकृती बिघडून जखमी झालेल्या दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम यांना अद्यापही आवश्यक मदत मिळालेली नसल्याचा आरोप करत सकल दिव्यांग संघटनेने प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. या संदर्भात सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी २ जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाची अधिकृत आवक घेण्यात आली असून, त्याच्या प्रती विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार, शासकीय कार्यक्रमादरम्यान कार्तिक कुमार भरतीपूरम यांची प्रकृती अचानक बिघडून...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला भोकरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ४ हजारांहून अधिक बालकांपैकी ३,६९३ जणांना लस

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला भोकरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; ४ हजारांहून अधिक बालकांपैकी ३,६९३ जणांना लस

आरोग्य
नांदेड /भोकर |  राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जून) भोकर शहरात मोठ्या उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या हस्ते हनुमान मंदिर येथील बूथवर बालकांना पोलिओची मात्रा पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. विष्णू मलसेठवार यांनी ग्रामीण रुग्णालयातील बूथला भेट देत नवजात बालकांनाही पोलिओची मात्रा पाजली तसेच शहरातील विविध लसीकरण केंद्रांची पाहणी केली. भोकर शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४,०१५ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३,६९३ बालकांना पहिल्याच दिवशी पोलिओची मात्रा देण्यात आली. या मोहिमेसाठी शहरात २१ लसीकरण बूथ, ३ ट्रान्झिट टीम आणि १ मोबाईल टीम कार्यरत होत्या. आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी सांगितले की, सोमवारपासून पु...
सेवा हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; गर्भवती महिलांसाठी दर महिन्याच्या २६ तारखेला मोफत तपासणी व सोनोग्राफी

सेवा हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; गर्भवती महिलांसाठी दर महिन्याच्या २६ तारखेला मोफत तपासणी व सोनोग्राफी

आरोग्य
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| ग्रामीण भागातील गर्भवती महिलांवर वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी व्हावा आणि माता-बाल आरोग्य अधिक सुरक्षित राहावे, या सामाजिक उद्देशातून हिमायतनगर येथील सेवा हॉस्पिटलच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या २६ तारखेला तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी तसेच प्रत्येक गर्भवती महिलेला एक मोफत सोनोग्राफी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना आर्थिक अडचणींमुळे वेळेवर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवा हॉस्पिटलने हा उपक्रम सुरू केला असून, त्याला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोफत तपासणीसोबतच सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून माता व बाल आरोग्य जनजागृती अभियानही सातत्याने राबविण्यात येत आहे. गर्भ...
error: Content is protected !!