सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

येरगी ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग

येरगी ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग

सामाजिक
ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी मार्गदर्शन; बालिका पंचायत उपक्रमाचे विशेष कौतुक नांदेड| केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी देगलूर तालुक्यातील येरगी येथे आयोजित ग्रामसभा आणि रिफॉर्म उत्सवात सहभागी होत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामविकासाच्या विविध विषयांवर ग्रामस्थांच्या सूचना, मते व अनुभव जाणून घेत त्यांनी शासनाच्या योजना आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. रिफॉर्म उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी उपक्रम आणि प्रशासकीय सुधारणांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी पी. नरहरी यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधून योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली. शासनाच्या योजनांची माहिती अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी यावेळी...
‘एक दिवस, एक तास, एक साथ’मधून नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

‘एक दिवस, एक तास, एक साथ’मधून नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

सामाजिक
हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; गावोगावी राबविली व्यापक स्वच्छता मोहीम नांदेड| ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील गावागावांत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबविली. जिल्ह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी हातात झाडू घेत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. या उपक्रमात महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, युवक मंडळे, ...
कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू

सामाजिक
मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांची पाटबंधारे विभागासोबत तातडीची बैठक नांदेड, प्रतिनिधी| यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नांदेड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोइफोडे यांनी १ ऑक्टोबर रोजी पालिका मुख्यालयात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.  बैठकीस नांदेड उत्तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड, उपअभियंता सतीश चव्हाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील सद्यस्थितीतील ८४.६१ टक्के पाणीसाठ्याचा पुढील पाव...
माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा खरा कणा

माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा खरा कणा

सामाजिक
प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढविण्यास आरटीआय प्रभावी साधन : डॉ. भीमराव हाटकर नांदेड, प्रतिनिधी| प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा अत्यंत प्रभावी असून, तो लोकशाहीचा खरा कणा आहे. या कायद्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळून पारदर्शकता वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कायदा अभ्यासक डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जागतिक माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे होते. डॉ. हाटकर म्हणाले की, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा सामान्य नागरिकांना सक्षम करणारा कायदा आहे. जनमाहिती अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींचे अचूक पालन करून नागरिकांना विहित मुदतीत माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. माहित...
शेळगाव नरसिंह येथे मंगळवारपासून आठवडी बाजाराला होणार प्रारंभ

शेळगाव नरसिंह येथे मंगळवारपासून आठवडी बाजाराला होणार प्रारंभ

सामाजिक
व्यापारी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : नारायण पाटील शहापूर, देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथे मंगळवार पासून नव्याने आठवडी बाजार सुरू होत आहे. या बाजारात भाजीपाला विक्रेते, कापड व्यापारी, कडधान्य विक्रेते यांच्यासह विविध व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण पाटील शेळगावकर यांनी केले आहे. सध्या शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिकांच्या उत्पादनासाठी मोठा कालावधी व खर्च करावा लागत आहे. मात्र बदलते हवामान, विविध रोगराई आणि पावसाची अनिश्चितता यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतीवरील खर्च वाढत असून शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी नगदी उत्पन्न मिळावे आणि दैनंदिन गरजांचा खर्च भागवता यावा, यासाठी भाजीपाला तसेच...
नांदेडकरांसाठी मनपाचा मोठा दिलासा; आता कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यू दाखला मिळणार

नांदेडकरांसाठी मनपाचा मोठा दिलासा; आता कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यू दाखला मिळणार

सामाजिक
नांदेड, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता संबंधित क्षेत्रीय कार्यालयातच जाण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी मनपा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ ते ६ तसेच मनपा मुख्यालयातील अविरत विभागातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही शासकीय अथवा खासगी दवाखाना, रुग्णालय किंवा रुग्णालयाबाहेर जन्म अथवा मृत्यू झाल्यानंतर त्याची रीतसर नोंदणी झाल्यास, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना आपल्या सोयीच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात जाता येणार आहे. त्यामुळे शहरातील एका भागातील नागरिकांना केवळ संबंधित भागातील कार्यालयातच जाण्याची गरज भासणार नसून नजीकच्या पालिका कार्यालयातूनच प्रमाणपत्र घेता येणार आ...
डांबर कुठे? शहापूर-सुडगी फाटा रस्त्यावर मुरुमाची ‘डागडुजी’!

डांबर कुठे? शहापूर-सुडगी फाटा रस्त्यावर मुरुमाची ‘डागडुजी’!

सामाजिक
खड्डे बुजविण्याऐवजी मुरुम-गिट्टीचा थर; पावसात रस्ता पुन्हा चिखलमय होण्याची शक्यता — कामाच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांचा सवाल देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर ते सुडगी फाटा या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खड्ड्यांमध्ये डांबर व गिट्टी टाकून रोलरच्या साहाय्याने दबाई करण्याऐवजी चक्क मुरुम व गिट्टी पसरवून रस्ता दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊनही रस्त्याचा प्रश्न कायम राहणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. शहापूर ते सुडगी फाटा मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असून दुचाकीस्वार आणि एसटी बससह इतर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श...
२२ व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना . हेमंत पाटील

२२ व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना . हेमंत पाटील

सामाजिक
नांदेड| महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तथा श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ, करकाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २२ व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. हेमंतभाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ग्रामीण जीवन, साहित्य आणि संस्कृतीला व्यासपीठ देणाऱ्या या संमेलनात विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत, कथाकथन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या विविध समित्यांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून तयारीला सुरुवात झाली आहे. स्वागताध्यक्ष ना .हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन लोकाभिमुख आणि दर्जेदार करण्याच्या...
विद्यार्थी ११ दिवसांपासून धरण्यावर; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, प्रशासन मात्र उदासीन!

विद्यार्थी ११ दिवसांपासून धरण्यावर; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, प्रशासन मात्र उदासीन!

सामाजिक
जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेविरोधात SFI-DYFIचे आंदोलन; विरोधी पक्षनेते व खासदारांची भेट, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार नांदेड, अनिल मादसवार | जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी SFI व DYFI नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, ११ दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनावर ठाम असतानाही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्या...
अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चा

अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चा

सामाजिक
मातंग समाजासह लाभवंचित जातींचा सहभाग; जिल्ह्यातील जनसंवाद बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड| अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचवावा, या मागणीसाठी १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता महामोर्चाला सुरुवात होणार असून, मातंग समाजासह अनुसूचित जातीतील लाभवंचित समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात उपवर्गीकरणाचा मार्ग खुला केला आहे. त्यानंतर विविध राज्यांनी याबाबत निर्णय घेतला असताना महाराष्ट्रात अद्याप उपवर्गीक...
error: Content is protected !!