श्रावण मास उत्सवानिमित्त तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी घेतले श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन

भाविकांच्या सुविधांचा घेतला आढावा; मंदिर व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण मास उत्सवानिमित्त हिमायतनगरच्या तहसीलदार तथा श्री परमेश्वर मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी मंगळवारी मंदिरास भेट देऊन श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मंदिरातील धार्मिक वातावरणाचा आढावा घेत भाविकांच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी केली. श्रावण महिन्यात श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येत असल्याने दर्शन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भाविकांची सुरक्षितता तसेच मंदिर परिसरातील आवश्यक सुविधा याबाबत त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला.

भाविकांना श्रावण मासातील धार्मिक उत्सवाचा आनंद घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासन व समितीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Oplus_16908288

यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक अनिल मादसवार, संजय माने, मारोती हेंद्रे, पंडित ढोणे, पापा पार्डीकर यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.

श्रावण मासाच्या निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक उपक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण असून, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात आहे. हर हर महादेव! 🔱🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!