कामारी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने कामारी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत जिल्हा परिषद शाळा, कामारी येथे पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, उपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच गरजूंना मोफत औषध वितरणाचीही सुविधा देण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी मुरलीधर उमाटे (वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता) – 9921112903, आमदार बाबुराव कदम कोहळीकर संपर्क कार्यालय – 9359121352 / 6232323273 यां क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!