श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| वाढोणा ( हिमायतनगर, जि. नांदेड) येथे श्री राम नवमी व श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त शनिवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही शोभायात्रा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बाजार चौकातील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन सर्व साधू-संत व माय-माऊलीच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या शोभायात्रेत भजन व विविध धार्मिक सादरीकरणे हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. विशेषतः प्रभु श्रीराम लल्ला, बाहुबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गौमाता राष्ट्रमाता यांच्या झांक्यांमुळे मिरवणूक अधिक आकर्षक ठरणार आहे.

तसेच भजन सम्राट विकास भैय्या परदेशी (श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड) यांचे भजन सादरीकरण आणि रिध्दम लाईव्ह साउंडची साथ यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

हि मिरवणुक श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दीक्षा भूमी चौक, सुदर्शन कॉर्नर, सराफा लाईन, महात्मा फुले चौक, श्री परमेश्वर मंदिर, श्री परमेश्वर गल्ली मार्गे लकडोबा चौक येथील हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी व श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!