करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीला मान्यवरांची सदिच्छा भेट

जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीला मान्यवरांची सदिच्छा भेट

करियर
नांदेड| जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीला सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी समाजातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन अकॅडमीची पाहणी केली. यावेळी सरदार महेंद्रसिंघ लांगरी, सरदार गुरमितसिंघ महाजन, सरदार तेजपालसिंघ खेड आणि सरदार लक्कीसिंघ रामगडिया यांनी अकॅडमीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेत व्यवस्थापनाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी सरदार तेजपालसिंघ खेड यांनी सध्याच्या काळात समाजातील युवक-युवतींसाठी तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांची गरज अधोरेखित केली. अशा अभ्यासक्रमांच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित व कुशल पॅरामेडिकल मनुष्यबळाची असलेली गरज पूर्ण करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. नांदेडसारख्या शहरात जी. डी. गोएंका हेल्थकेअर अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्र...
शेतकरी कुटुंबातील अमोल बासेवाड यांची आरोग्य अधिकारीपदी निवड

शेतकरी कुटुंबातील अमोल बासेवाड यांची आरोग्य अधिकारीपदी निवड

करियर
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत दररोज १२ तास अभ्यास; जिद्द व मेहनतीच्या जोरावर मिळवले यश हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील आदेगाव येथील शेतकरी कुटुंबातील अमोल कैलास बासेवाड यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अमोल यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमोल बासेवाड यांचे वडील कैलास बासेवाड आणि आई विजयालक्ष्मी बासेवाड यांनी शेतीत कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आर्थिक व ग्रामीण परिस्थितीची जाणीव असतानाही मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून अमोल यांनी अभ्यासात सातत्य कायम ठेवले. दररोज तब्बल १२-१२ तास अभ्यास करत त्यांनी स्पर्धा...
कुणबी मराठा महासंघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष नारायण माने यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार

कुणबी मराठा महासंघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष नारायण माने यांना ‘समाज भूषण’ पुरस्कार

करियर
अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात सामाजिक, आरोग्य, कृषी, समाजसेवा व उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा अहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी कुणबी मराठा महासंघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष नारायणराव माने यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग तसेच समाज संघटनाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत नारायण माने यांना हा पुरस्कार देण्यात आला. याच सोहळ्यात हिमायतनगर तालुक्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. विकास वानखेडे...
दोन नव्या पुस्तकांमुळे डॉ. शेख शेहनाज अहमद यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव

दोन नव्या पुस्तकांमुळे डॉ. शेख शेहनाज अहमद यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव

करियर
‘सकारात्मक जीवन यात्रा’ आणि ‘राम का भव्य और अलौकिक स्वरूप’चे प्रकाशन; प्राचार्यांसह प्राध्यापक वृंदाकडून सत्कार हिमायतनगर| हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शेख शेहनाज अहमद यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांच्या दोन नव्या पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले. ‘सकारात्मक जीवन यात्रा’ आणि प्रभू श्रीरामांच्या जीवन व आदर्शांवर आधारित ‘राम का भव्य और अलौकिक स्वरूप’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन पुस्तकांच्या प्रकाशनासह डॉ. शेख शेहनाज अहमद यांच्या नावावर आतापर्यंत एकूण १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ‘सकारात्मक जीव...
माधव गायकवाड यांची रयत शिक्षण संस्थेत पदवीधर शिक्षकपदी निवड

माधव गायकवाड यांची रयत शिक्षण संस्थेत पदवीधर शिक्षकपदी निवड

करियर
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश; शहापूरच्या गुणवंत सुपुत्राचे सर्वत्र कौतुक देगलूर /शहापूर, प्रतिनिधी| प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शहापूर येथील माधव पुढलिक गायकवाड यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पवित्र पोर्टलअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत पदवीधर शिक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शहापूर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून ग्रामस्थ, मित्रमंडळी व शिक्षकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माधव गायकवाड हे शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अंशकालीन निर्देशांक पदावर कार्यरत होते. तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा चालवत असतानाही त्यांनी शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी सोडली नाही. दिवसभर शाळेचे काम केल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत त्...
ग्रामीण भागातील संस्कृती दोसलवार यांची एमबीबीएससाठी निवड

ग्रामीण भागातील संस्कृती दोसलवार यांची एमबीबीएससाठी निवड

करियर
शहापूर तालुक्यातील वनाळी गावच्या विद्यार्थिनीची हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड; माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते सत्कार देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील वनाळी येथील संस्कृती गंगाधर दोसलवार हिची हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि ध्येयवादी प्रयत्नांच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देगलूर येथील माजी नगरसेवक शैलेश उल्लेवार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्कृतीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना शैलेश उल्लेवार म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर निश्चित ध्ये...
सरिता जडलावार यांना उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

सरिता जडलावार यांना उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

करियर
शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान; शिक्षक दिनानिमित्त देगलूर येथे गौरव देगलूर /शहापूर (प्रतिनिधी) ‘शिक्षण ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्याचे प्रभावी माध्यम आहे’ हा विचार उराशी बाळगून शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शहापूर येथील पीएम श्री शाळेच्या शिक्षिका सरिता जडलावार यांना ‘उपक्रमशील व गुणवंत शिक्षिका पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट, देगलूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तुषार राठोड, आमदार जितेश अंतापूरकर आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर यांच्या हस्ते सरिता जडलावार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरिता जडलावार यांन...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात

करियर
हिमायतनगर (प्रतिनिधी) येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रेरणास्थान हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. रणखांब, उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कांगणे, प्रा. दिवडे व प्रा. पाटील यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ...
हिमायतनगरात २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ मेळावा

हिमायतनगरात २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ मेळावा

करियर
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आयोजन; बारावी, पदवी व डिप्लोमाधारकांना रोजगाराची संधी हिमायतनगर, अनिल मादसवार | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांनी जपलेल्या ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथे होणार आहे. मेळाव्यात बारावी, पदवी आणि डिप्लोमा शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांचे प्रतिनिधी प्लेसमेंट ड्राइव्हसाठी उपस्थित राहणार आहेत. पात्र उमेदवार...
निष्णात पत्रकारिता व प्रभावी निवेदनासाठी अमृतजी गोजे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव

निष्णात पत्रकारिता व प्रभावी निवेदनासाठी अमृतजी गोजे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने गौरव

करियर, तेलंगणा
निझामाबाद /नांदेड| पत्रकारिता, जनसंज्ञापन, निवेदक (Anchor) तसेच इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्काराने पत्रकार श्री. अमृतजी गोजे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या निष्णात पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, पारदर्शक भूमिका आणि प्रभावी निवेदकीय शैलीची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. समाजात सकारात्मकता, नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या निष्कलंक व उत्कृष्ट पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणे, हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माउंट आबू येथील ‘शांतिवन’ किंवा ‘ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ परिसरात आयोजित विशेष राष्ट्रीय संमेलनांमध्ये देश-विदेशातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. पत्रकारिता क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देताना अमृतजी गोजे या...
error: Content is protected !!