शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

शेती
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार; रामतीर्थ येथे प्रात्यक्षिक नांदेड| अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भर दिला आहे. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाची सुरुवात बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रगतिशील शेतकरी व पशुपालक गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करून पशुधनाला आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्...
पीक कापणी प्रयोगासह जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

पीक कापणी प्रयोगासह जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

शेती
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे; राहुल कर्डिले यांचे निर्देश नांदेड| दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पाणी, चारा व महसूलविषयक बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे शेतकरी सुरेश हणमंत हिंगोले यांच्या गट क्रमांक १२३ मध्ये आयोजित पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत उपस्थित होते. पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी आणि प्रयोगाची अचूकता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गीते, तहसीलदार भरत सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदा...
दुष्काळाच्या झळा; तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन केली पाहणी

दुष्काळाच्या झळा; तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन केली पाहणी

शेती
शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी मांडल्या बळीराजाच्या व्यथा; तातडीच्या मदतीची मागणी हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वडगाव (ज), सिबदरा (ज) व खैरगाव (ज) परिसरातील दुष्काळी परिस्थितीची आज तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन पाहणी केली. यावेळी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर, जिल्हा व तालुका कृषी विभागाचे अधिकारी, पिक विमा कंपनीचे संबंधित अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी अधिकाऱ्यांसोबत विविध शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली दयनीय अवस्था अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने पंचनामे, पीक विमा व दुष्काळी मदतीची प्रक...
शहापूर परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल

शहापूर परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल

शेती
शेतात आठ हजारांचा भाव, बाजारात मात्र पाच हजारांवर; मजुरीच्या वाढत्या खर्चाचाही फटका देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले|  यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला शहापूर परिसरात सुरुवात झाली असून, उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे पिकाला अपेक्षित उत्पादन मिळत नसताना दुसरीकडे बाजारभावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग व उडदाची लागवड केली होती. मूग व उडदाचे पीक वर्षभराच्या घरगुती गरजेपुरतेच घेतले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी कडधान्याची साठवण केली. मात्र, बाजारात पैसे मोजूनही मूग व उडदाची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मूग व उडदाची काढणी पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मजुरांकडून कापणीसाठी मोठी मजुरी मागितली जात असल्य...
आयडीबीआय बँकेकडून कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची मागणी

आयडीबीआय बँकेकडून कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची मागणी

शेती
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचा संताप; पात्र लाभार्थ्यांना तातडीने नवीन पीककर्ज देण्याची मागणी शहापूर, देगलूर, गंगाधर मठवाले | सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, तसेच कर्जमाफीनंतर नवीन पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी आयडीबीआय बँक व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच इतर काही बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून काहींच्या खात्यावर कर्जाची रक्कमही जमा ...
कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या!

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या!

शेती
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन; घोषणाबाजी करत आंदोलकांची धडक देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा व खरीप पीककर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी अंबेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे प्रतीक म्हणून वाळलेले सोयाबीन हातात देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विलंब न करता वस्तुनिष्ठ पीक...
ऑक्टोबरपर्यंत शेतात काय धतुरा राहणार? सोयाबीनची रास होऊन जाणार

ऑक्टोबरपर्यंत शेतात काय धतुरा राहणार? सोयाबीनची रास होऊन जाणार

शेती
५ ऑक्टोबरच्या पंचनाम्यांवर शेतकऱ्यांचा संताप — “पीक काढल्यानंतर पंचनामा कशाचा?” देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुका व परिसरात पावसाने डोळे वटारल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संकटाचा ठरला आहे. पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद यासह खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ५ ऑक्टोबरपासून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी तोपर्यंत सोयाबीनची कापणी, रास आणि मळणी होऊन गेली तर पंचनामा नेमका कशाचा होणार? असा संतप्त सवाल शहापूर परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी करून कोळपणी, निंदणी, फवारणी यासाठी मोठा खर्च केला. अनेकांनी बँकांचे तसेच खासगी कर्ज घेतले, तर काहींनी घ...
पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘शेत सेतू’ अभियानाचा लाभ घ्यावा

पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘शेत सेतू’ अभियानाचा लाभ घ्यावा

शेती
विकास विक्रम कळकेकर यांचे आवाहन; पांदण रस्त्यांवरील अतिक्रमणे सामोपचाराने हटविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती अभियान’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ याचा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे तालुका उपाध्यक्ष विकास विक्रम कळकेकर यांनी केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील पांदण व शेतरस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न सामोपचाराने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच सर्व गावांमध्ये विशेष मोहीम राबवून आवश्यक त्या ठिकाणी जाहीर नोटीस काढावी, अशी मागणी कळकेकर यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेले पांदण रस्ते अतिक्रमणामुळे बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना ...
शहापूर येथे पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा

शहापूर येथे पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा

शेती
पिकांवर संकटाचे सावट असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह कायम; मानकरी शंकर पर्वतराव पाटील यांच्या बैलजोडीची मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौजे शहापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शेतकऱ्यांनी बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रगरगोटी लावली. तसेच गुळवणी व तेल पाजून बैलांची पूजा करण्यात आली. सायंकाळी पोळ्याचे मानकरी शंकर पर्वतराव पाटील यांनी बैलजोडीसह मारोती मंदिराभोवती पाच फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी शेतीतील अडचणी आणि पिकांची चिंता काही काळ बाजूला ठेवत बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून पोळा सण जल्लोषात साजरा केला. यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर संकटाचे सावट आहे. सोयाबीन, कापूस व इतर खरीप पिकांची अवस्था चिंताजनक असतानाही वर्षातून एकदा येणाऱ्य...
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ३२ गावांत उत्साहात बैलपोळा; दुष्काळाचे सावट

ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ३२ गावांत उत्साहात बैलपोळा; दुष्काळाचे सावट

शेती
ढोल-ताशांच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक; सामुदायिक विवाह सोहळे व महाआरतीने पोळा सण साजरा नांदेड, प्रतिनिधी | ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांमधील ३९ ठिकाणी गुरुवारी (१० सप्टेंबर) पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपल्या सर्जा-राजाची आकर्षक सजावट करून हनुमान मंदिरात विधिवत पूजन, प्रदक्षिणा, आरती तसेच अनेक गावांत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. तुप्पा, जवाहरनगर, भायेगाव, वाजेगाव, कांकाडी, नागापूर, राहेगाव, वांगी, पुणेगाव, वाडीपुयड, वसरणी, असरजन, वाघळा, असदवन, पिंपळगाव यासह ३२ गावांत पोळ्यानिमित्त मोठी गर्दी झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बाभुळगावात सामुदायिक विवाह सोहळा सामाजिक व शैक्षणिक चळवळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बा...
error: Content is protected !!