हिमायतनगरच्या कन्या शाळेसमोर गतिरोधक बसवा; अपघाताचा धोका टाळा – मुख्याध्यापकांची मागणी

अन्यथा सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन छेडावे लागेल – रामभाऊ सूर्यवंशी

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेसमोर वाढत्या वाहतूक वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी शाळेसमोर तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी मुख्याध्यापकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर शाळेत एकूण ५९१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळा दोन सत्रांत भरवली जाते. दुपारी १२ वाजता पहिले सत्र सुटताच सुमारे ३०० विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडतात, तर त्याच वेळी दुसऱ्या सत्रातील २९१ विद्यार्थी शाळेत प्रवेश करतात. त्यामुळे शाळा परिसरात मोठी गर्दी होत असून रस्ता कायमच वर्दळीचा असतो.

या ठिकाणी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने विद्यार्थ्यांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वीही काही विद्यार्थ्यांचे अपघात झाल्याची नोंद आहे. वारंवार नगरपंचायत प्रशासनाला सूचना देऊनही गतिरोधक बसविण्याबाबत दिरंगाई होत असल्याची खंत मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे.

Oplus_16908288

आगामी मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने पावले उचलून शाळेसमोर गतिरोधक बसवावे, अशी मागणी पालकांकडूनही जोर धरत आहे. आता नगरपंचायत प्रशासन यावर काय..? निर्णय घेते आणि किती लवकर कार्यवाही होते, याकडे शहरातील शिक्षणप्रेमी व पालकांचे लक्ष लागले आहे.

अन्यथा सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन छेडावे लागेल – रामभाऊ सूर्यवंशी

oplus_32

याबाबत बोलताना भाजपचे कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी यांनी सांगितले की, आतापर्यंत आमच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते व शाळा प्रशासनाने शाळेसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर करण्याची मागणी केली. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. तात्काळ नगरपंचायतने येथे स्पीड ब्रेकर बसऊन संभाव्य धोका टाळावा नाही तर या सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!