हिमायतनगरात २९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

हिमायतनगर|  हिमायतनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता परमेश्वर मंदिराजवळ, बस स्टँड परिसरात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

पहिले सत्र (सायं. ४ वाजता): या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन पाटील (समाज व विचार मंच) राहणार असून उद्घाटन माजी आमदार माधवराव कदम कोळीकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे उपस्थित राहणार आहेत.

दुसरे सत्र (सायं. ६.३० वाजता): या सत्राचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे राहणार असून उद्घाटन माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नासेर पटेल आझाद (हिंगोली लोकसभा) तसेच शेख रफीक यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रेरणादायी भाषणे होणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध युवा गायक संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हानवते, नांदेड जिल्हाध्यक्ष देवानंद गुंडेकर, जिल्हा संघटक गंगाधर गायकवाड दिघीकर, उपाध्यक्ष राम चिंतलवाड, तालुका सचिव सुभाष गुंडेकर, सहसंघटक प्रशांत राहुल वाड, तालुका अध्यक्ष अनिल नाईक, उपाध्यक्ष मनोज तपासकर, शहर अध्यक्ष यादव दत्ता येनेकर, शहर उपाध्यक्ष सदाशिव पतंगे, कार्याध्यक्ष कैलास कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव प्रयत्नशील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!