धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अंगारिका चतुर्थीनिमित्त वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अंगारिका चतुर्थीनिमित्त वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धर्म अध्यात्म
नगरसेविका दर्शना शरद चायल यांनी घेतले मनोभावे दर्शन; शहर-तालुक्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची केली प्रार्थना हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| अंगारिका चतुर्थीनिमित्त हिमायतनगर येथील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या श्री वरदविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी श्री वरदविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी हिमायतनगर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १च्या नगरसेविका सौ. दर्शना शरद चायल यांनी श्री वरदविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्व मायबाप जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. अंगारिका चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची वर्दळ राहिली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता....
डीजेचा दणदणाट नाही; टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप

डीजेचा दणदणाट नाही; टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप

धर्म अध्यात्म
हिमायतनगरचा गणेशोत्सव ठरला आदर्श; भक्ती, परंपरा अन् शिस्तीचा जागर — शांततेत विसर्जन हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| डीजेचा दणदणाट नाही, ध्वनिप्रदूषणाचा गोंगाट नाही... टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-अभंगांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हिमायतनगर शहरातील गणरायाला यंदा भावपूर्ण निरोप देण्यात आला. शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत वारकरी परंपरेला प्राधान्य दिल्याने विसर्जन मिरवणुकीत भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडले. शुक्रवारी सुरू झालेली प्रमुख गणेश मंडळांची मिरवणूक अनंत चतुर्दशीचा मुहूर्त उशिरा असल्याने शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी साडेसात वाजता प्रमुख गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात भजनी मंडळांनी अभंग व भक्तिगीते सादर केली. फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला....
शहापूर येथे भरपावसात गणेश विसर्जन शांततेत!

शहापूर येथे भरपावसात गणेश विसर्जन शांततेत!

धर्म अध्यात्म
डीजेला फाटा; ढोल-ताशा, टाळ-मृदंग व फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला भावपूर्ण निरोप शहापूर, गंगाधर मठवाले| शहापूर येथील नवू गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, पूजापाठ तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर भरपावसातही मोठ्या उत्साहात आणि शांततेत गणरायाचे विसर्जन करण्यात आले. नवू गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीची आकर्षक सजावट करून ती ट्रॅक्टरवर विराजमान केली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग - मिरवणुकीत महिला मंडळासह नवतरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही म...
‘हर हर महादेव’च्या जयघोषात १४ ज्योतिर्लिंगांचे एकाच ठिकाणी दर्शन

‘हर हर महादेव’च्या जयघोषात १४ ज्योतिर्लिंगांचे एकाच ठिकाणी दर्शन

धर्म अध्यात्म
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी आकर्षक धार्मिक देखावा; महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड, प्रतिनिधी| ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण करणारा देशभरातील १४ ज्योतिर्लिंग मंदिरांचा आकर्षक प्रतिकात्मक देखावा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या मिलरोड येथील निवासस्थानी महालक्ष्मीसमोर साकारण्यात आला आहे. श्रद्धा, कल्पकता आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या या देखाव्याला महिला भाविकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतात भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे प्रचलित मानली जातात. मात्र नागेश्वर ज्योतिर्लिंगाबाबत गुजरातमधील द्वारका तसेच महाराष्ट्रातील औंढा नागनाथ यांचा उल्लेख केला जातो. त्याच प्रमाणे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाबाबत झारखंडमधील देवघर तसेच महाराष्ट्रातील परळी वैजनाथ या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख आढळतो. या संकल्पनेतून ॲड. दिलीप ठाकूर यांनी यंदा १४ ...
सहस्रकुंड ते वाढोणा भव्य कावड यात्रा; श्री परमेश्वराचा जलाभिषेक

सहस्रकुंड ते वाढोणा भव्य कावड यात्रा; श्री परमेश्वराचा जलाभिषेक

धर्म अध्यात्म
भगवे वस्त्र, हातात कावड अन् ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने हिमायतनगर दुमदुमले; आई-वडिलांचे चरणस्पर्श करून घेतला आशीर्वाद हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| श्रावणातील धार्मिक परंपरेचा जागर करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पुढाकारातून यंदाही बाणगंगा सहस्रकुंड महादेव मंदिर ते वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिर अशी भव्य कावड यात्रा काढण्यात आली. भगवे वस्त्र परिधान केलेल्या युवकांनी खांद्यावर कावड घेऊन भक्तिभावाने पदयात्रा पूर्ण केली. हिमायतनगर शहरात कावड यात्रा दाखल होताच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांपासून ही कावड यात्रा धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून आयोजित केली जाते. सहस्रकुंड येथील बाणगंगा महादेव मंदिरातून पवित्र जल घेऊन कावडधारी युवक पदयात्रेद्वारे वाढोणा शहरातील श्री परमेश्वर मंदिराकडे मार्गक्रमण करतात. यंदाही मोठ्या उत्साहात कावड यात्रा पार पडली....
देगलूर ते करडखेड भव्य पदयात्रेचे आयोजन

देगलूर ते करडखेड भव्य पदयात्रेचे आयोजन

धर्म अध्यात्म
१४व्या वर्षात अखंड भक्तीची परंपरा; शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देगलूर, गंगाधर मठवाले| श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही देगलूर ते करडखेड या मार्गावर भव्य शिवभक्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड भक्तीची परंपरा जपत ही पदयात्रा यंदा १४व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही पवित्र पदयात्रा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ७ वाजता बंडयाप्पा मठस्थान, गांधी चौक, देगलूर येथून प्रारंभ होणार आहे. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात शिवभक्त या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. दरवर्षी या पदयात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजक संतोष पाटील यांनी केले आहे. ‘हर हर महादेव’, ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषात निघणाऱ्या या पदयात्रेमुळे देगलूर परि...
गोदावरीतीरी इतिहासाचा जागर ; नांदेडमध्ये ‘बंदासिंघ बहादूर मिलाप दिन’ उत्साहात साजरा

गोदावरीतीरी इतिहासाचा जागर ; नांदेडमध्ये ‘बंदासिंघ बहादूर मिलाप दिन’ उत्साहात साजरा

धर्म अध्यात्म
गुरु गोविंदसिंघजी महाराज व बाबा बंदासिंघ बहादूर यांच्या ऐतिहासिक भेटीला उजाळा ; बंदा घाट गुरुद्वारात विविध कार्यक्रम नांदेड| शीख इतिहासातील ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस म्हणून ओळखला जाणारा 'बंदासिंघ बहादूर मिलाप दिन' गुरुवारी (३ सप्टेंबर) नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी नदीच्या तीरावरील बंदा घाट गुरुद्वारा येथे विविध धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सन १७०८ मध्ये याच दिवशी नांदेड येथे श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ दरवर्षी 'मिलाप दिन' साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमासाठी बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांच्या मार्गदर्शनाखाली लुधियाना येथून विशेष जत्था नांदेडमध्ये दाखल झाला होता. जत्थ्याच्या उपस्थितीत बंदा घाट गुरुद...
काबरानगरात २७ ऑगस्टपासून श्रीकृष्णकथामृताचे आयोजन

काबरानगरात २७ ऑगस्टपासून श्रीकृष्णकथामृताचे आयोजन

धर्म अध्यात्म
नांदेड, प्रतिनिधी| श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिरात २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान ‘श्रीकृष्णकथामृत’ अर्थात श्रीकृष्ण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. श्री विक्रमजी नांदेडकर यांच्या अमृतमय वाणीतून भाविकांना श्रीकृष्ण चरित्र व भक्तीमय कथांचे श्रवण करता येणार आहे. श्रीकृष्ण आणि श्रीराम हे भारतीय संस्कृतीतील आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जन्मोत्सवाला देशभरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. याच पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने काबरानगर येथील श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. परमपूज्य वरदानंद भारती यांनी रचलेले ‘श्रीकृष्णकथामृत’ हे श्रीकृष्ण चरित्राचे साररू...
श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा : माहूरगडच्या सह्याद्रीत श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीची अनोखी अनुभूती

श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा : माहूरगडच्या सह्याद्रीत श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीची अनोखी अनुभूती

धर्म अध्यात्म
नांदेड/हदगांव/हिमायतनगर/माहूर, प्रतिनिधी| माहूरगड हे महाराष्ट्रातील प्रमुख दत्तक्षेत्रांपैकी एक असून, या पवित्र भूमीला भगवान श्री दत्तात्रेय, माता रेणुका आणि माता अनसूया यांच्या धार्मिक परंपरेमुळे विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच माहूरगडच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये श्रावण शुक्ल चतुर्दशी आणि नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर पार पडणारी श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमा ही दत्तभक्तांसाठी श्रद्धा, साधना, नामस्मरण आणि आत्मशुद्धीची अत्यंत महत्त्वाची धार्मिक परंपरा मानली जाते. श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होणाऱ्या या परिक्रमेचे धार्मिक माहात्म्य कालिका खंड व सह्याद्री खंडातील उल्लेखांशी जोडले जाते. या परंपरेनुसार माहूरगडचा सह्याद्री परिसर हा प्राचीन काळापासून देवता, ऋषी-मुनी, साधू-संत आणि तपस्वींच्या साधनेने पवित्र झालेली तपोभ...
पदोन्नतीनंतर श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक; सौ. पल्लवीताई टेमकर यांनी घेतले श्रींचे दर्शन

पदोन्नतीनंतर श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक; सौ. पल्लवीताई टेमकर यांनी घेतले श्रींचे दर्शन

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, अनिल मादसवार| उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर हिमायतनगरच्या तहसीलदार तथा श्री परमेश्वर मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा सौ. पल्लवीताई टेमकर यांनी श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 21ऑगस्ट रोजी भेट देऊन श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी श्री परमेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेत त्यांनी मंदिरात प्रार्थना केली.   यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक वामनराव बनसोडे, ॲड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, श्याम जक्कलवाड, गजानन हरडफकर, मायंबा होळकर, प्रवीण कोमावार, रामभाऊ सूर्यवंशी, दशरथ गोसलवाड, पंडित ढोणे आदींसह मंदिर कमिटीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. पदोन्नतीनंतर मंदिरात झालेल्या या भेटीप्रसंगी उपस्थितांनी सौ. पल्लवीताई टेमकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या ...
error: Content is protected !!