गणेशवाडीतील विद्यार्थिनी राधिका टारपे हिची पोलीस भरतीत निवड

किनवट/हिमायतनगर| गट ग्रामपंचायत जिरोणा अंतर्गत गणेशवाडी येथील विद्यार्थिनी कु. राधिका शाम टारपे हिची पोलीस भरतीत निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राधिका हिने मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी जिरोणा येथील पोलीस पाटील प्रतिनिधी गंगाधर मिराशे तसेच जाधव अकॅडमी, गोकुंदा (किनवट) यांच्या वतीने तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या कुटुंबीयांमध्ये व गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!