बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
नांदेड| आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चादरम्यान बौद्ध समाजातील महिला व मुलींविषयी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कथित लैंगिक व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेविका अंजलीताई सुरेश गायकवाड यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून लक्ष्मण ढोबळे यांच्यासह मंचावर उपस्थित सचिन साठे, प्रा. सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, कथित वक्तव्यामुळे कार्यक्रमातील महिला व मुलींना मानसिक त्रास, अपमान, भीती आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला. तसेच कार्यक्रमस्थळी काही व्यक्तींनी बौद्ध समाजातील महिलांविषयी जातीय स्वरूपाची शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यक्तींची ओळख कार्यक्रमाच्या ...









