राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

खा. शरदचंद्र पवार यांच्या पत्राची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या

खा. शरदचंद्र पवार यांच्या पत्राची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या

राजकारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा नांदेड |  महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रातील मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शासनाने विव...
बाळासाहेबांचे विचार अंगार; फुंकर मारली की शिवसेना पुन्हा धगधगेल!

बाळासाहेबांचे विचार अंगार; फुंकर मारली की शिवसेना पुन्हा धगधगेल!

राजकारण
शिंदे गटातील पदाधिकारी, सरपंच-उपसरपंचांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश; देगलूर-बिलोलीत संघटनात्मक बैठकीत पोतदारांचा एल्गार देगलूर, गंगाधर मठवाले| शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे अंगार आणि निखाऱ्यासारखे आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला शिवसैनिक आजही लढण्याच्या भूमिकेत आहे. या निखाऱ्यावर केवळ फुंकर मारण्याची गरज असून शिवसेना पुन्हा धगधगेल, असा दावा नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी केला. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी हॉटेल स्वाद ओंकार रेसिडेन्सी येथे झाली. यावेळी पोतदार बोलत होते. यावेळी शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य स...
देगलूर तहसील कार्यालयासमोर दुष्काळी जीआरची होळी

देगलूर तहसील कार्यालयासमोर दुष्काळी जीआरची होळी

राजकारण
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची थेट मदत, कर्जमाफी व पीकविमा देण्याची शिवसेनेची मागणी देगलूर, गंगाधर मठवाले| महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकरी व शेतमजुरांसाठी ठोस आर्थिक मदत जाहीर न झाल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने देगलूर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या जीआरची होळी करून निदर्शने करण्यात आली. सोमवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने केवळ दुष्काळ जाहीर न करता प्रत्यक्ष मदत करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये थेट मदत, खरीप पीककर्ज माफी, १०० टक्के पीकविमा भरपाई, रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत, वीजबिल माफी आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच गावागावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांत बदलणे, जलसंधारणाची कामे सुरू कर...
कामारीतील कै. सुभाष शिरफुले यांच्या कुटुंबीयांना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची १ लाखांची मदत

कामारीतील कै. सुभाष शिरफुले यांच्या कुटुंबीयांना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची १ लाखांची मदत

राजकारण
मुलांच्या शिक्षणाची चिंता नको; दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत दिला आधार हिमायतनगर | उत्कर्ष मादसवार : दुष्काळाचे संकट, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने आधीच अडचणीत सापडलेल्या कामारी येथील शिरफुले कुटुंबाला हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मदतीचा हात दिला. गुरुवारी त्यांनी कै. सुभाष केशवराव शिरफुले यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मुलांच्या शिक्षणासाठी तब्बल १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. कै. सुभाष शिरफुले यांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. त्यातच सततची दुष्काळी परिस्थिती आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा कुटुंबासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम कोहळीकर यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कुटुंबीय...
शहापूर ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी लाथाळीची शक्यता!

शहापूर ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी लाथाळीची शक्यता!

राजकारण
तब्बल तीन-चार दशकांनंतर खुले आरक्षण; ‘मीच सरपंच’ म्हणत इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण यंदा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तब्बल तीन-चार दशकांनंतर सरपंचपद खुले झाल्याने अनेक इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, “सरपंच तर मीच!” अशा आविर्भावात अनेक जण वावरताना दिसत असल्याची चर्चा गावात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध आरक्षणाच्या प्रवर्गात सरपंचपद गेले होते. यंदा खुले आरक्षण जाहीर होताच ग्रामपंचायत निवडणुकीच्या संभाव्य राजकीय समीकरणांना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या समर्थकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. एकाच पदासाठी अनेक दावेदार - सरपंचपद खुले झाल्याने गावातील विविध राजकीय गट ...
सरपंच आरक्षणाने कुणाचा पत्ता कट, कुणाला लागली लॉटरी?

सरपंच आरक्षणाने कुणाचा पत्ता कट, कुणाला लागली लॉटरी?

राजकारण
हिमायतनगर तालुक्यात राजकीय समीकरणांना हादरा; इच्छुकांची धावपळ, गटबाजीला उधाण हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हिमायतनगर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालयात पार पडली. आरक्षणाचा निकाल जाहीर होताच तालुक्यातील गावागावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, अनेक इच्छुकांचे सरपंचपदाचे स्वप्न भंगले तर काहींसाठी राजकीय मैदान खुले झाले आहे. आरक्षण सोडतीपूर्वी सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या अनेक इच्छुकांना आता नव्या राजकीय समीकरणांचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे, आरक्षण आपल्या प्रवर्गासाठी पडलेल्या गावांमध्ये इच्छुकांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेतून तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. कुठे पत्ता कट, कुठे राजकीय लॉटरी? - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच सर्वसाधारण आणि महिल...
कोरडा दुष्काळ जाहीर करा; शिवसेना ठाकरे पक्षाचे देगलूर तहसीलसमोर आंदोलन

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शिवसेना ठाकरे पक्षाचे देगलूर तहसीलसमोर आंदोलन

राजकारण
खरीप पिके करपली; शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीकविमा व कर्जमाफीची मागणी देगलूर, गंगाधर मठवाले | पावसाळा संपत आला तरी देगलूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप पिके वाळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे देगलूर व बिलोली तालुका कोरड्या दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करून शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी देगलूर तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशानुसार, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील डक व सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान शासनाच्या विरोधात जोरदार घोष...
श्रीराम सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता जाधव

श्रीराम सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता जाधव

राजकारण
पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलेची चेअरमनपदी बिनविरोध निवड; नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड देगलूर, गंगाधर मठवाले| श्रीराम सहकारी पतसंस्था, देगलूरच्या अध्यक्षपदी सौ. सुजाता शिवाजी जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची अध्यक्षपदी निवड झाल्याने या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पतसंस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी सौ. सुजाता शिवाजी जाधव, उपाध्यक्षपदी सुभाष इंगोले, सचिवपदी गणेश कदम तर कोषाध्यक्षपदी चंद्रकांत गोविंदवार यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. यावेळी देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर, एल. वाय. शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते तथा नांदेड जिल्हा शिक्षण समितीचे माजी स्वीकृत सदस्य जीवनराव पाटील वडजे, सेवानिवृत्त केंद्र...
चार महिन्यांपासून आधार केंद्र बंद; देगलूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बोंबाबोंब आंदोलन

चार महिन्यांपासून आधार केंद्र बंद; देगलूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बोंबाबोंब आंदोलन

राजकारण
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील पोस्ट कार्यालयातील आधार कार्ड नोंदणी केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या औचित्याने पोस्ट कार्यालयासमोर बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांनी केले. देगलूर तालुक्यातील नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातील हे एकमेव सुरू असलेले आधार केंद्र होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ते बंद असल्याने आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती तसेच इतर आधारसंबंधित कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना आणि विविध प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरि...
सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा हिमायतनगरात संताप; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा हिमायतनगरात संताप; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

राजकारण
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह व असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी, राजकीय विरोध असला तरी महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले. महिलांचा सन्मान अबाधित राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा प्रकारच्या कथित वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग...
error: Content is protected !!