हिमायतनगरात गुरुवारी विशेष मतदार पडताळणी (SIR) कॅम्प मतदारांनी उपस्थित राहून नाव व माहितीची खात्री करावी
नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांचे आवाहन
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अचूक व त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करण्याच्या उद्देशाने हिमायतनगर शहरात गुरुवारी सकाळी १० वाजता चौपाटी परिसरात विशेष मतदार पडताळणी (SIR) कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
या कॅम्पमध्ये मतदारांना मतदार यादीतील नाव, पत्ता व इतर माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब असल्याचे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी सांगितले.
या विशेष कॅम्पला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, शहरातील सर्व नगरसेवक तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्व मतदारांनी या संधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने कॅम्पमध्ये सहभागी व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे...









