माहिती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मृग नक्षत्र सुरू, तरीही पावसाची प्रतीक्षा कायम; हिमायतनगर तालुक्यात शेतकरी चिंतेत

मृग नक्षत्र सुरू, तरीही पावसाची प्रतीक्षा कायम; हिमायतनगर तालुक्यात शेतकरी चिंतेत

माहिती, शेती
पेरणीसाठी शेतकरी सज्ज, मात्र वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या नजरा हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्राची सुरुवात होऊन तब्बल सात दिवस उलटून गेले असतानाही हिमायतनगर शहरासह तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा दिवसेंदिवस मावळताना दिसत असून, वरुणराजाच्या कृपादृष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची सर्व कामे पूर्ण केली असून, बियाणे व खतांची खरेदीही करून ठेवली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असले, तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरणी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाची दमदार सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आकाशाकडे डोळे लावून बस...
राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी

माहिती
छत्रपती संभाजीनगर| समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव यांच्या मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा शनिवार, 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.   परीक्षेसंदर्भातील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल संकेतस्थळ⁠ https://www.maharashtrasrpf.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), गेट क्रमांक 01, 03, 05 व 08, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर, चाटे स्कूल, गट क्रमांक 98, रेणुका माता मंदिर रोड, बीड बायपास, सातारा परिसर तसेच एंजल स्कूल, सातारा परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.   उमेदव...
30 एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

30 एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा

महाराष्ट्र, माहिती
मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मंत्री अतुल सावे नांदेड| राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी 30 एप्रिल 2026 रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृह येथे 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या मेळाव्याचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती...
दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

माहिती, शेती
पुणे| महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा असून राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा सुमारे २.८ टक्के, तर कृषी उत्पन्नात तब्बल २५.१ टक्के वाटा आहे. वाढती लोकसंख्या, वाढणारी श्रमशक्ती आणि दुधाची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत आहे. दुग्ध उत्पादनात वाढीची मोठी संधी - सध्या महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे वार्षिक उत्पादन १६.६२ MMT आहे. मात्र, प्रति व्यक्ती आवश्यक ३५८ ग्रॅम दुधाच्या तुलनेत सध्या केवळ ३०० ग्रॅम उपलब्धता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी दुग्धव्यवसायात मोठी संधी निर्माण झाली आहे. उद्योजकतेकडे वाटचाल - पारंपारिक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिल्या जा...
आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

माहिती, लेख
पुणे| शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असून कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा हा व्यवसाय ‘एटीएम’सारखा ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने ग्रामीण तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे हा व्यवसाय अधिक सक्षम होत असून स्वयंरोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. स्वयंरोजगाराचा प्रभावी पर्याय ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन हा एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय ठरत आहे. ‘सेमी-स्टॉल फीडिंग’ (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय अधिक फायदेशीर केला जात आहे. विशेष म्हणजे, घरातील महिला देखील हा व्यवसाय सांभाळून स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न मिळवू शकतात. शेळी व मेंढी को...
मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप

मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप

माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व आवश्यक उपसाधने उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये ९० टक्के शासकीय अनुदान असून उर्वरित १० टक्के हिस्सा बचत गटांकडून दिला जातो. लाभाची रक्कम थेट गटांच्या आधार-संलग्न संयुक्त खात्यात जमा केली जाते. नांदेड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, सन २०२३-२४ मध्ये १० तर २०२४-२५ मध्ये तब्बल ७३ बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे. आनंदनगर येथील राणी महिला बचत गट हा योजनेचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. २०२४-२५ मध्ये निवड झाल्यानंतर या गटाला मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर ...
आईच्या कष्टांना यशाची किनार

आईच्या कष्टांना यशाची किनार

माहिती, स्थानिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांचे मोल जाणणाऱ्या मुलाची कहाणी म्हणजे सरसम बु. येथील रोहित संदीप बिच्चेवार यांचे यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित यांनी नांदेड जिल्हा पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरावर दुःखाचे सावट आले होते. मात्र या कठीण काळात त्यांच्या आईने हार न मानता कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. “मुलांना शिकवून मोठे करायचे” या निर्धाराने त्यांनी रोहितला सतत प्रेरणा दिली. आईचे कष्ट आणि संघर्ष पाहून रोहित यांनीही स्वतःला अभ्यास व मैदानी चाचण्यांसाठी पूर्णतः झोकून दिले. या अथक परिश्रमाचे फळ मिळत रोहित यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि काका यांना दिले आहे. रोहितच्या या य...
error: Content is protected !!