‘द महाराष्ट्र अर्थ सायन्स PYQ’s कॉम्पेंडिअम’ पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड|महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित सायन्स कॉलेज, नांदेड येथे प्रा. आकाश करंडे लिखित 'द महाराष्ट्र अर्थ सायन्स PYQ's कॉम्पेंडिअम' (‘The Maharashtra Earth Science PYQ’s Compendium’ ) या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनानंतर प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामलताई पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, उपप्राचार्य प्रा. एम. खिल्लारे आणि उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या भूशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे असून, विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा सखोल संग्रह त्य...





