महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

शेती
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार; रामतीर्थ येथे प्रात्यक्षिक नांदेड| अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भर दिला आहे. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाची सुरुवात बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रगतिशील शेतकरी व पशुपालक गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करून पशुधनाला आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्...
पीक कापणी प्रयोगासह जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

पीक कापणी प्रयोगासह जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

शेती
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे; राहुल कर्डिले यांचे निर्देश नांदेड| दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती, पाणी, चारा व महसूलविषयक बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे शेतकरी सुरेश हणमंत हिंगोले यांच्या गट क्रमांक १२३ मध्ये आयोजित पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत उपस्थित होते. पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी आणि प्रयोगाची अचूकता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आवश्यक सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गीते, तहसीलदार भरत सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदा...
स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे निधन

स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे निधन

महाराष्ट्र
ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी आवाज हरपला नांदेड, प्रतिनिधी| ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी आयुष्यभर नाते जोडून कार्य करणारे स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे १ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वच्छता व ग्रामविकास चळवळीतील एक अभ्यासू, संवेदनशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’च्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेला केवळ परिसर स्वच्छ ठेवण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. लोकसहभाग, पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि सामाजिक जाणीव या बाबींना त्यांनी आपल्या कार्यातून प्राधान्य दिले. राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील अनुभव आणि ग्रामविकासाचा विचार विविध व्यासपीठांवर मांडला. कोलंब...
दुष्काळाच्या झळा; तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन केली पाहणी

दुष्काळाच्या झळा; तहसीलदारांसह अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जाऊन केली पाहणी

शेती
शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी मांडल्या बळीराजाच्या व्यथा; तातडीच्या मदतीची मागणी हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील वडगाव (ज), सिबदरा (ज) व खैरगाव (ज) परिसरातील दुष्काळी परिस्थितीची आज तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या पथकाने शेतशिवारात जाऊन पाहणी केली. यावेळी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर, जिल्हा व तालुका कृषी विभागाचे अधिकारी, पिक विमा कंपनीचे संबंधित अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पुत्र दिनेश राठोड यांनी अधिकाऱ्यांसोबत विविध शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली दयनीय अवस्था अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने पंचनामे, पीक विमा व दुष्काळी मदतीची प्रक...
मुदखेड व मुखेडचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करा!

मुदखेड व मुखेडचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करा!

महाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा नांदेड| राज्यामध्ये यंदा खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. 'ट्रिगर-१' लागू न झाल्याच्या तांत्रिक कारणास्तव मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा या यादीत समावेश होऊ शकला नाही. परंतु, पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती व शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता या दोन तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवले असून, त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात खा. अशोकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले ...
शहापूर परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल

शहापूर परिसरात सोयाबीन काढणीला सुरुवात; उत्पादन घटल्याने शेतकरी हतबल

शेती
शेतात आठ हजारांचा भाव, बाजारात मात्र पाच हजारांवर; मजुरीच्या वाढत्या खर्चाचाही फटका देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले|  यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला शहापूर परिसरात सुरुवात झाली असून, उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे पिकाला अपेक्षित उत्पादन मिळत नसताना दुसरीकडे बाजारभावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग व उडदाची लागवड केली होती. मूग व उडदाचे पीक वर्षभराच्या घरगुती गरजेपुरतेच घेतले जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी कडधान्याची साठवण केली. मात्र, बाजारात पैसे मोजूनही मूग व उडदाची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मूग व उडदाची काढणी पूर्ण झाल्यानंतर आता सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मजुरांकडून कापणीसाठी मोठी मजुरी मागितली जात असल्य...
कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत द्या

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने ५० हजारांची मदत द्या

महाराष्ट्र
अखिल भारतीय छावा संघाची मागणी; उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देगलूर, गंगाधर मठवाले| पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके हातची गेली असून, दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघाच्या शहापूर-देगलूर तालुका शाखेने केली आहे. संघाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, देगलूर यांना निवेदन देऊन तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपये तातडीचे अनुदान देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके उगवण्यापूर्वीच संकटात आली, तर काही ठिकाणी उगवलेली पिके निदणी, फवारणी व कोळपणीपर्यंत आली होती. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने उभी पिके अक्षरशः होरपळून गेली आहेत. पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्या...
आयडीबीआय बँकेकडून कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची मागणी

आयडीबीआय बँकेकडून कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची मागणी

शेती
शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचा संताप; पात्र लाभार्थ्यांना तातडीने नवीन पीककर्ज देण्याची मागणी शहापूर, देगलूर, गंगाधर मठवाले | सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, तसेच कर्जमाफीनंतर नवीन पीककर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी आयडीबीआय बँक व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच इतर काही बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून काहींच्या खात्यावर कर्जाची रक्कमही जमा ...
जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

क्रीडा
शहापूरमध्ये गणेशोत्सवात भक्तिमय वातावरण; क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देगलूर/शहापूर | शहापूर येथील जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून एकतेचा संदेश देत सकाळ-सायंकाळ पूजा, पाठ व आरतीचे आयोजन करण्यात येत असून, दीड क्विंटल तांदळाचे अन्नदान करण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सर्वत्र तरुणाई विविध क्रीडा स्पर्धांमधून मैदान गाजवत असताना जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण दहा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार १०० रुपये निखिल अचनगार यांच्या स्मरणार्थ व्यंकट मामडे यांच्या वतीने देण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक ३ हजार १०० रुपये मलनरेड्डी चितलवार यांच्या वतीने देण्यात आले. महिला...
कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या!

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या!

शेती
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन; घोषणाबाजी करत आंदोलकांची धडक देगलूर, गंगाधर मठवाले| नांदेड जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा व खरीप पीककर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी निवासी सहाय्यक जिल्हाधिकारी अंबेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे प्रतीक म्हणून वाळलेले सोयाबीन हातात देत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विलंब न करता वस्तुनिष्ठ पीक...
error: Content is protected !!