Tag: हिमायतनगर

हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

हिमायतनगरातील स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

क्राइम
निष्काळजीपणाचा आरोप; परिसरात हळहळ व्यक्त नांदेड/हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये बुडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. सक्षम गायकवाड असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम नागराज गायकवाड हा किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कलमधील भिसी गावचा रहिवासी होता. तो आपल्या आईसोबत मामाच्या गावी लग्नसमारंभ साठी हिमायतनगर येथे आला होता. दरम्यान, स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा हट्ट केल्याने आई त्याला घेऊन गेली होती. मात्र पोहत असताना पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिमुकल्याच्या आईने रुग्णालयात धाय मोकलून आक्रोश केला. “पोटचा गोळा” गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही घटना पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. दरम्यान, ...
हिमायतनगरच्या रुक्मिणीनगरात भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

हिमायतनगरच्या रुक्मिणीनगरात भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

धर्म अध्यात्म
असंख्य भाविकांची उपस्थिती; महाप्रसादाचा घेतला लाभ हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिरात गुरुवार, दि. 14 रोजी भव्य हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सकाळी 9 वाजता वैदिक मंत्रोच्चारात होम-हवन विधी पार पडला. पुरोहित गजानन वाळके गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर, सचिव प्रा. कागणे सर, कापसे सर, विकास पाटील तसेच सुनील दमकोडवार यांनी सपत्नीक पूजा विधी करून धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला. श्री सिद्ध हनुमान मंदिरात गणपती, शिवलिंग, नंदी महादेव तसेच हनुमंतरायाच्या मूर्तींची विधिवत स्थापना करण्यात आली. या मंगल प्रसंगी शहरातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर “जय श्रीराम” आणि...
हिमायतनगरातील रुक्मिणीनगर येथे श्री सिद्ध हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

हिमायतनगरातील रुक्मिणीनगर येथे श्री सिद्ध हनुमान मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

धर्म अध्यात्म
१४ मे रोजी होम-हवन व महाप्रसादाचे आयोजन हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील रुक्मिणीनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्ध हनुमान मंदिर येथे भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. मंदिर परिसरात सकाळी ६ ते ९ या वेळेत महोत्सव होम-हवन विधी पार पडणार असून, या धार्मिक विधीचे मार्गदर्शन श्री गजानन वाळके गुरु करणार आहेत. तसेच सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी रुक्मिणीनगर परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचि जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील लोहरेकर तर सचिव प्रा. कागणे व सह मंदिर...
हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

शेती, सामाजिक
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमा...
हिमायतनगरच्या राजा भगीरथ विद्यालयाची एसएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

हिमायतनगरच्या राजा भगीरथ विद्यालयाची एसएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

करियर
हिमायतनगर| एसएससी बोर्ड परीक्षा 2025-26 च्या निकालात राजा भगीरथ विद्यालय, हिमायतनगरने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील वाघमारे पूजा तुळशीराम हिने 96 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कदम रुद्र रमेशराव व शिंदे सोहम दयानंद यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळवले. तसेच थोंबाळे समीक्षा गुरुप्रसाद (92%), सूर्यवंशी सानिका यशवंत (91.60%), वानखेडे ऋतुराज नामदेव (91.40%), सूर्यवंशी वेदिका देविदास (91.20%), सूर्यवंशी मुक्ता आत्माराम (90.60%), सुरोसे राघवेंद्र अंगद (90.40%) आणि शिंदे अभिजीत परमेश्वर (90%) यांनीही घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....
हिमायतनगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’चे आयोजन

हिमायतनगर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’चे आयोजन

सामाजिक
नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवांचा लाभ हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध अडचणी एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी ९.०० वाजता शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे पार पडणार आहे. या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण (डिजिटल स्वाक्षरीसह), उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जमीन अभिलेख अद्ययावत करणे, ई-मोजणी अर्ज, तसेच अकृषक (एनए) तरतुद...
हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

महाराष्ट्र
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असताना, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही काही ग्राहकांना जादा दर घेऊन दोन-दोन कॅनमध्ये डिझेल दिले जात असल्याचा आरोप आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता “पंप स्लो चालू आहे” असे कारण दिले जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर चालक व शेतकऱ्यांना डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र, शेतीच्या नावाखाली डिझेलचा साठा करून त्याची अवैध विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. वाहनधारका...
हिमायतनगरमध्ये वीज डीपीला आग; ५-६ तास शहर अंधारात

हिमायतनगरमध्ये वीज डीपीला आग; ५-६ तास शहर अंधारात

सामाजिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील वार्ड क्रमांक ६ येथे महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना दिनांक ४ रोजी सायंकाळी घडली. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष मुदेवाड व महेश गायकवाड यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर सुमारे अर्धा तास महावितरणचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. तसेच वीजपुरवठा तात्काळ बंद न केल्यामुळे आग अधिक भडकली. घटनेनंतर उशिरा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि संबंधित डीपीचे मेंटेनन्स करण्यात आले. त्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या घटनेमुळे शहरातील वीजपुरवठा तब्बल ५ ते ६ तास खंडित राहिला. वार्ड क्रमांक ६ मधील वस्तीत डीपीला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. ...
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ

तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये प्रचंड गर्दी झाल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. सर्व डबे हाऊसफुल झाल्यामुळे हिमायतनगरहून नांदेड व पुढील गावांकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. दरम्यान, रेल्वेने स्थानकावर अपेक्षेपेक्षा कमी वेळ थांबा घेतल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. तिकीट काढूनही प्रवास करता न आल्यामुळे अनेक प्रवाशांना स्टेशनवरच थांबावे लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत मागितले असता सुरुवातीला स्टेशन मास्टरने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रवाशांचा रोष वाढत असल्याचे पाहून अखेरीस तिकीटाची रक्कम परत करण्यात आली. याबाबत माहिती देताना मंगरूळ येथी...
नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका

नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका

करियर
यशाची परंपरा कायम!  ​हिमायतनगर (प्रतिनिधी) गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अध्यापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अनुभवी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे विद्यालयाने ८६.३५% निकालासह यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या यशामागे तालुक्यातील सर्वात अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्गाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेने ९५.२७% या उच्चांकी निकालाची नोंद केली असून, कला शाखेने ८०.९५% निकाल मिळवून तालुक्यात आपला नावलौकिक वाढवला आहे. विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कला शाखा: गुणांनुक्रमे अव्वल -  कु. शिवानी...
error: Content is protected !!