नामांकित ‘हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा’ एच.एस.सी. परीक्षेत डंका

यशाची परंपरा कायम! 
​हिमायतनगर (प्रतिनिधी) गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध अध्यापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अनुभवी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे विद्यालयाने ८६.३५% निकालासह यशाची सुवर्ण परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयाच्या या यशामागे तालुक्यातील सर्वात अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्गाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेने ९५.२७% या उच्चांकी निकालाची नोंद केली असून, कला शाखेने ८०.९५% निकाल मिळवून तालुक्यात आपला नावलौकिक वाढवला आहे. विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कला शाखा: गुणांनुक्रमे अव्वल –  कु. शिवानी विश्वंभर राणे (८३.५०%) – प्रथम, कु. रुपाली बंडू जाधव (७९.३३%) – द्वितीय,  कु. शिवानी संभाजी बेळगे (७७.५०%) – तृतीय तर विज्ञान शाखा: गुणांनुक्रमे अव्वल –  कु. सबीना खान शब्बीर खान (७३.६७%) – प्रथम, कु. इब्रा आझम सयद अजमल (७०.६७%) – द्वितीय, कु. स्नेहा दत्तात्रय चितलवाड (७०.००%) – तृतीय क्रमांक मिळविला आहे. केवळ उत्तीर्ण होणेच नव्हे, तर गुणवत्तेतही या विद्यालयाने बाजी मारली आहे. एकूण परीक्षार्थींपैकी १० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) मिळवले असून, ३५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.

​मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था, हिमायतनगर संचलित या विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा, माजी केंद्रीय राज्यमंत्री (भारत सरकार) मा. सूर्यकांता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच संस्थेचे सचिव श्री. अरुणजी कुलकर्णी सर, सर्व संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक श्री. रणखांब सर यांनी “हे यश अनुभवी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला आहे. ​तालुक्यातील सर्व स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!