हिमायतनगरच्या राजा भगीरथ विद्यालयाची एसएससी परीक्षेत उज्ज्वल कामगिरी

हिमायतनगर| एसएससी बोर्ड परीक्षा 2025-26 च्या निकालात राजा भगीरथ विद्यालय, हिमायतनगरने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शाळेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील वाघमारे पूजा तुळशीराम हिने 96 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कदम रुद्र रमेशराव व शिंदे सोहम दयानंद यांनी प्रत्येकी 93.40 टक्के गुण मिळवले. तसेच थोंबाळे समीक्षा गुरुप्रसाद (92%), सूर्यवंशी सानिका यशवंत (91.60%), वानखेडे ऋतुराज नामदेव (91.40%), सूर्यवंशी वेदिका देविदास (91.20%), सूर्यवंशी मुक्ता आत्माराम (90.60%), सुरोसे राघवेंद्र अंगद (90.40%) आणि शिंदे अभिजीत परमेश्वर (90%) यांनीही घवघवीत यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!