करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हे बंध समाजनिष्ठेचे’ ग्रंथाला ग्रंथ गौरव पुरस्कार; डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचा विचार मंचातर्फे सत्कार

हे बंध समाजनिष्ठेचे’ ग्रंथाला ग्रंथ गौरव पुरस्कार; डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचा विचार मंचातर्फे सत्कार

करियर
नांदेड | समाजप्रबोधन, साहित्यसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध चिकित्सक डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचा चळवळी योद्धे स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने बुधवारी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. जोशी पाटोदेकर लिखित 'हे बंध समाजनिष्ठेचे' या समाजप्रबोधनपर ग्रंथाला प्रतिष्ठेचा प्रसाद प्रतिष्ठान ग्रंथ गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच नांदेड येथे झालेल्या विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, डॉ. जोशी पाटोदेकर यांनी वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता समाजसेवेचे प्रभावी माध्यम बनविले. त्याचबरोबर आपल्या साहित्यलेखनातून त्यांनी सामाजिक बांधिलकी, मानवी मूल्ये, लोकजागृती आणि समाजनिष्ठ विचार...
कामारी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा लेट-लतिफ कारभार; संतप्त पालकांचा घेराव

कामारी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा लेट-लतिफ कारभार; संतप्त पालकांचा घेराव

करियर
शाळेच्या वेळेनंतरही विद्यार्थी गेटबाहेर; जबाबदार शिक्षकांवर कारवाईची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कथित उशिरा हजेरीमुळे सोमवारी (दि. १४ जुलै) पालक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही काही शिक्षक वेळेवर शाळेत न पोहोचल्याने संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर घेराव घालत जाब विचारला. सकाळी शाळेची वेळ होऊनही अनेक विद्यार्थी शिक्षकांची प्रतीक्षा करत शाळेच्या गेटबाहेर उभे असल्याचे चित्र पाहून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी असा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना काही शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासला ज...
महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगची दैदिप्यमान कामगिरी

महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगची दैदिप्यमान कामगिरी

करियर
मेन ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक; दत्ता बारसे यांना 'फर्स्ट ऑफिसर' पदोन्नती नांदेड | महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील 3 MAH AIR SQN NCC, Pune अंतर्गत कार्यरत एनसीसी एअर विंगने सी.ए.टी.सी.-७१६ (Combined Annual Training Camp-2026) मध्ये दुहेरी यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दि. ५ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित शिबिरात महाराष्ट्रातील ११ शाळांच्या एनसीसी पथकांनी सहभाग घेतला होता. शिबिरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मेन ड्रिल स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूलच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट शिस्त, अचूक संचलन आणि प्रभावी समन्वयाचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह नांदेड जिल्हा आणि 3 MAH AIR SQN NCC, Pune युनिटच्या नावलौकिकात भर पडली आहे. या यशामागे एनसीसी एअर विंगचे ए.एन.ओ. दत्ता बारसे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, कठोर पर...
डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

करियर
तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार नांदेड | महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेडच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि तृतीयपंथी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. जेठवाणी यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य, ला...
विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर
प्राचार्यांसमवेत आढावा बैठक; शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी सोडविण्यास प्राधान्य नांदेड | विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित हेच विद्यापीठाचे सर्वोच्च प्राधान्य असून, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सोमवारी (१३ जुलै) आयोजित महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत प्राचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, परी...
मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

करियर
निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेची दखल; 'टाईम्स न्यूज २४'च्या संपादकाचा मानाचा सन्मान मुंबई/नांदेड, प्रतिनिधी| जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण पत्रकारिता करणारे 'टाईम्स न्यूज २४' या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'स्वाभिमान लेखणी' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित 'पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा–२०२६' अंतर्गत रविवारी (१२ जुलै) मुंबई येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते वागदरीकर यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यास श्रीधर कीर, विसुभाऊ ...
‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची निवड

‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची निवड

करियर
१२ जुलै रोजी मुंबईत होणार सन्मान; नांदेडच्या पत्रकारितेला आणखी एक मानाचा बहुमान नांदेड, अनिल मादसवार| पत्रकारितेतील निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत टाईम्स न्यूज २४ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांची प्रतिष्ठेच्या 'स्वाभिमान लेखणी' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा आयोजक, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केली. आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित 'पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा-२०२६' या कार्यक्रमात १२ जुलै रोजी मुंबई येथे वागदरीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र, विश्वासार्ह आणि ...
पोटा येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोटा येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील आबादी परिसरातील अंगणवाडी इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या जमिनीवर ठिकठिकाणी मोठी छिद्रे पडली असून, त्यातून घुशी माती बाहेर काढत असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. बालके बसतात त्या ठिकाणीही जमिनीला भगदाडे पडली असून, पावसाळ्यात या छिद्रांमध्ये विंचू, साप तसेच इतर विषारी व सरपटणारे प्राणी लपण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने अंगणवाडी इमारतीची पाहणी करून जमिनीवर फरशी बसविणे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. चिमुकल्या बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित उपाय...
कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर

कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर

करियर
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार यांचा होणार गौरव; ग्रंथप्रकाशनाचाही सोहळा नांदेड| प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, नांदेड येथे उत्साहात संपन्न होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशनही होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात 'मातृश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता, मुंबईचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 'प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार' यंदा कवी अजीम नवाज राही (बुलडाणा) यांच्या 'वळीवाच्या वेळा' या साहित्यकृती...
बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

करियर
नांदेड | बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसाहित्य हे प्रभावी माध्यम असून, उत्तम बालसाहित्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, विचारप्रक्रिया विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत यांनी केले. उदगीर येथील अहिल्यादेवी गार्डन सभागृहात माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार लिखित 'बोलका ढोल' आणि 'मॅडम मॅडम शाळा सोडा' या दोन बालसाहित्य पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा माजी प्राचार्या सौ. मैनाताई साबणे होत्या. डॉ. सावंत म्हणाले की, बालसाहित्य वाचनामुळे मुलांमध्ये अनुभव आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. त्यांची विनोदबुद्धी, मानसिक क्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. घटना-घडामोडींना स...
error: Content is protected !!