महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नारायण माने सोनारीकर यांची निवड

हिमायतनगर | महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नारायण माने सोनारीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच तालुका उपाध्यक्षपदी अमोल कलाणे कामारवाडीकर, तर शहरी उपाध्यक्षपदी राम पाटील पतंगे पारवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नांदेड येथे महाराष्ट्र कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीशभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत हिमायतनगर तालुका कार्यकारिणी नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. मागील वर्षभरापासून शहराध्यक्ष म्हणून काम करताना तालुकाभर शाखा स्थापन करून समाजाच्या विविध प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत संघटनेची व्याप्ती वाढविण्यात नारायण माने सोनारीकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या कार्यशैली, नेतृत्वगुण व संघटन कौशल्याची दखल घेत त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बैठकीत प्रदेश सचिव व्यंकटराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, प्रदेश संघटक रामेश्वर काकडे, उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष प्रकाश पावडे, मुदखेड तालुक्यातील सल्लागार बजरंग मनुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विलासराव वानखेडे, चंद्रकांत वानखेडे, प्रकाश पाळजकर, रामेश्वर मोरे, आबाराव पवार, रामराव माने, प्रकाश कल्याणे, रंगराव कल्याणकर, भीमराव मनमनते, रामराव धुधढे, शंतनू वळशे, गोविंद शिंदे, बाबाराव माने, नारायण अल्लूरे आणि गंगाराम वानखेडे (विदुळकर) यांचीही उपस्थिती होती.

नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!