सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पाच वर्षांतच महामार्गाला तडे ; स्पीड ब्रेकरअभावी अपघातांची मालिका! सोनारी फाट्यावरील नागरिकांची माजी आमदार जवळगावकरांकडे धाव

पाच वर्षांतच महामार्गाला तडे ; स्पीड ब्रेकरअभावी अपघातांची मालिका! सोनारी फाट्यावरील नागरिकांची माजी आमदार जवळगावकरांकडे धाव

सामाजिक
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावर १५ ते २० अपघातांत १० ते १२ जणांचा मृत्यू हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन अवघी पाच वर्षे झाली; मात्र काही वर्षांतच या महामार्गाला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच गावांच्या मुख्य चौकात, बसथांब्यांवर आणि फाट्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक स्पीड ब्रेकर, बॅरिकेट किंवा सूचना फलक नसल्याने हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या मार्गावर आतापर्यंत झालेल्या सुमारे १५ ते २० अपघातांमध्ये १० ते १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. तरीही संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. आठ दिवसांत तीन बळी; प्रशासन अजूनही झोपेत? मागील काही दिवसांत टाकरा...
‘हा रस्ता की खड्ड्यांचा सापळा?’; नागरिकांचा संताप, वामन पावडे मंगल कार्यालय ते छत्रपती नगर मार्गाची दुरवस्था

‘हा रस्ता की खड्ड्यांचा सापळा?’; नागरिकांचा संताप, वामन पावडे मंगल कार्यालय ते छत्रपती नगर मार्गाची दुरवस्था

सामाजिक
आमदार बालाजी कल्याणकरांकडे सी.सी. रस्ता व ड्रेनेजची मागणी नांदेड, प्रतिनिधी| शहरातील वामन पावडे मंगल कार्यालय ते छत्रपती नगर, उमा महेश कॉलनी आणि आशिष नगरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि चिखलामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेत निवेदन दिले. हा रस्ता परिसरातील अनेक वस्त्या आणि गल्लींना पूर्णा रोड तसेच छत्रपती चौकाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता ओळखणेही कठीण होते. परिणामी घसरून पडण्या...
खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी मार्गावर प्रवास की जीवघेणी परीक्षा?

खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी मार्गावर प्रवास की जीवघेणी परीक्षा?

सामाजिक
दोन-तीन वेळा दुरुस्ती करूनही रस्ता पुन्हा उखडला; नागरिकांचा संताप अनावर हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता आता मोठी डोकेदुखी ठरत आहे. काही ठिकाणी रस्ता शोधावा लागतो, तर काही ठिकाणी खड्डे चुकवताना वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. त्यामुळे ‘रस्ता कुठे आहे, की खड्ड्यांमध्येच हरवला?’ असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. या महत्त्वाच्या मार्गाची मागील काही काळात दोन-तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच डांबर उखडून रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होणाऱ्या कामांचा दर्जा आणि दुरुस्तीच्या कामांवर होणारा खर्च याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. खड्डे चुकविताना अपघाताचा धोका रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे ख...
घरकुलांचे बांधकाम न करताच अनुदान लाटल्याचा आरोप

घरकुलांचे बांधकाम न करताच अनुदान लाटल्याचा आरोप

सामाजिक
तक्रारदाराच्या कुटुंबातील लाभार्थीवरही निधी हडपल्याची तक्रार, शहापूर ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी शहापूर/ देगलूर, गंगाधर मठवाले| प्रधानमंत्री आवास योजना आणि मोदी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम न करताच काही लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी लेखी मागणी शहापूर येथील गंगाधर मठवाले यांनी गटविकास अधिकारी, देगलूर यांच्याकडे केली आहे. शहापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोदी आवास योजनेंतर्गत एकूण ८५ घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या टप्प्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करताच अनुदानाची रक्कम उचलल्याची तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वी हनमलू पोतदार यांनी घरकुल बांधकामासंदर्भात तक्रार...
हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर | हिमायतनगर येथील योगी पीठाचे मानद योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने योगसाधना क्षेत्रासह हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता लकडोबा चौक येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजई, मुलं, असा मोठा परिवार आहे. योगसाधना आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत. स्व. परमेश्वर पानपट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏...
आ. बाबुराव कदम यांच्या हस्ते हदगाव आगारात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

आ. बाबुराव कदम यांच्या हस्ते हदगाव आगारात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

सामाजिक
प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव हदगाव, गौतम वाठोरे| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हदगाव आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बससेवेमुळे मतदारसंघातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन बसगाड्यांच्या आगमनामुळे हदगाव आगाराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, प्रवाशांना आधुनिक सुविधांसह सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता एसटी महामंडळाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आगारप्रमुख धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य ढोले बापू, नगराध्...
विविध भावभावनांचे गुंफण करणारा संग्रह: फुंकर–सौ. सुचिता वडजे (जोगदंड)

विविध भावभावनांचे गुंफण करणारा संग्रह: फुंकर–सौ. सुचिता वडजे (जोगदंड)

सामाजिक
नांदेड| हालाकीच्या परिस्थितीत शिक्षणाचे अज्ञान असलेल्या शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. कमी वयातच वडिलांचे छत्र हरवले आणि सोबत बहिणीची माया ही हरवली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे सुरू झाले तर दुसरीकडे शिक्षणाचा प्रवास थांबला पण बालपणापासूनच त्यांच्या मनात झालेल्या परिस्थितीचा परिणाम त्यांना चिंतन करायला भाग पाडत गेला. चिंतन करताना अंधाऱ्या रात्री मनात त्यांच्या शब्दांची जुळवाजुळव नकळतच होऊ लागली आणि हळूहळू हा रोजचाच नित्यक्रम झाला. यात परिस्थितीची चिंतन करत असताना एका कवीचा जन्म झाला. आयुष्यात आलेल्या चढउतारात फुंकर घालणारी व्यक्ती असल्यास माणसाच्या जीवनात अजून संघर्ष करण्यास बळ मिळतं, याचे महत्त्व सांगणारा फुंकर कवितासंग्रह . पुस्तकाचं शीर्षक असलेल्या पहिल्याच कवितेत ज्यात कवी दुःख,संघर्ष, झळा,अवघड वाटा, अनवाणी पायाला टोचणारे काटे सगळं सहन करतो फक्त त्याच्या मनावर नवी ...
पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

सामाजिक
हिमायतनगर तालुक्यात वृक्षलागवडीच्या नावाखाली शासनाच्या निधीची उधळपट्टी? लावलेली ५० टक्के रोपे वाळली; शेकडो रोपे उघड्यावर फेकली..! सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..! हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, याच काळात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या वृक्षलागवडीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सवना, सिरंजणी, पळसपूर आणि हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांपैकी तब्बल ५० टक्के रोपे पाण्याअभावी वाळून गेल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. रोपे लावली, फोटो काढले आणि जबाबदारी संपली का? वृक्षलागवड झाल्यानंतर रोपांना पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात रोपे लावून त्यांची देखभाल करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल...
चौपाटीवर मतदारांची गर्दी; ‘माझं नाव मतदार यादीत आहे ना?’ याची खात्री करण्यासाठी हजारोंची धावपळ

चौपाटीवर मतदारांची गर्दी; ‘माझं नाव मतदार यादीत आहे ना?’ याची खात्री करण्यासाठी हजारोंची धावपळ

सामाजिक
SIR कॅम्पला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नाव व माहिती दुरुस्तीला प्राधान्य तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पुढाकारातून कॅम्पची सुरुवात हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नेहमी गजबजणाऱ्या हिमायतनगरच्या चौपाटीवर गुरुवारी राजकीय सभा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष मतदार पडताळणी (SIR) कॅम्पमुळे चौपाटी परिसराला अक्षरशः ‘मतदार पडताळणी केंद्रा’चे स्वरूप आले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमध्ये हजारो महिला-पुरुष मतदारांनी सहभाग घेतला. नाव, पत्ता आणि मतदार यादीतील इतर माहिती तपासण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. विशेषतः २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्य...
एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात १०० वृक्षांचे वृक्षारोपण

सामाजिक
नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात मंगळवारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, प्रवासी आणि प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले. "वृक्षारोपण ही काळाची गरज असली तरी वृक्षांचे संगोपन होऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली, तरच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश मिळेल," असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवदास हमंद यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला परिवहन अधिकारी चिन्मय चिटणीस, आगारप्रमुख दिग्...
error: Content is protected !!