
पुसद /हिमायतनगर | मूळचे हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील रहिवासी तथा सध्या पुसद येथे वास्तव्यास असलेले नरसिंगराव किसनराव बोंपिलवार यांचे उपचारादरम्यान दिनांक 27 रोजी सकाळी 9 वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.


त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, बहिणी, मेव्हणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.


त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी पुसद येथे मोक्षधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


