
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स व इतर आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, एस. आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकानिहाय ‘ऑन दि स्पॉट’ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.


या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे मोजमाप घेऊन कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स, एएफओ, स्मार्ट बूट तसेच इतर आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे.


समीर पटेल यांनी सांगितले की, लाभार्थ्यांनी शिबिरास उपस्थित राहताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. गरजू अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.


तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक
मुदखेड – 23 जून
अर्धापूर – 24 जून
हदगाव – 25 जून
माहूर – 26 जून
किनवट – 27 जून
हिमायतनगर – 28 जून
भोकर – 29 जून
उमरी – 30 जून
धर्माबाद – 1 जुलै
बिलोली – 2 जुलै


देगलूर – 3 जुलै
नायगाव – 4 जुलै
मुखेड – 5 जुलै
कंधार – 6 जुलै
लोहा – 7 जुलै
नांदेड – 8 जुलै 2026
समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पात्र आणि गरजू दिव्यांग व्यक्तींनी या शिबिरांचा लाभ घेऊन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, फारुख कुरेशी, पवन भोरे, निहाल पटेल, अहमद भाई, रमेश गोडबोले, शबीर बेग, गजानन शिंगणे, शेख इमरान, सलीम भाई, धुरपत सूर्यवंशी, शेख साजिद, संविधान जोगदांडे, नासेर पेंटर, बंडू पाटे आदी उपस्थित होते.
