
हदगाव | नांदेड जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स तसेच आवश्यक दिव्यांग साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी हदगाव येथील श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालयात ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर उत्साहात पार पडले.


जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नांदेड, एस.आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून कृत्रिम अवयवांचे मोजमाप घेण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना आवश्यक दिव्यांग साहित्याचे तात्काळ वितरणही करण्यात आले.


शिबिराला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, गटविकास अधिकारी डी. के. आडेराघोव, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल, विस्तार अधिकारी बालासाहेब पवार, व्ही. एम. मुंडकर, सतीश फुलारी आणि शाखा अभियंता एस. एस. नालंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालय, हदगाव तसेच इतर दिव्यांग शाळांतील शिक्षक शिवाजी पाळेकर, बालाजी वाघमारे, मोहनराव डाके, संजय तावडे, गजानन मोरे, आसिफ शेख, ठाकरे सर, प्रभाकर मुधोळ, बुद्धभूषण नरवाडे, सचिन माने, साईनाथ शिराळे यांच्यासह शेकडो दिव्यांग लाभार्थी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.


यावेळी जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, रसूल कुरेशी, पवन भोरे, निहाल पटेल, अहमदभाई, रमेश गोडबोले, शबीर बेग, गजानन शिंगणे, शेख इमरान, सलीमभाई, धुरपतर सूर्यवंशी, शेख साजिद, अस्लम, नासेर पेंटर, बंडू पाटे आदी मान्यवरही उपस्थित होते. या शिबिरामुळे दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहाय्यक साहित्य एकाच ठिकाणी आणि तात्काळ उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
