
हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच सोशल मीडियाद्वारे आवाहन


हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील सर्व मतदारांसाठी विशेष मतदार पडताळणी (SIR) मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित कालावधीत फॉर्म भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


या मोहिमेद्वारे मतदार यादीतील माहितीची पडताळणी व अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःची माहिती नोंदवून घ्यावी तसेच आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनाही याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


फॉर्म भरताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी ही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत.


ही मोहीम ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बी.एल.ओ. (BLO) मार्फत राबविण्यात येणार असून, नागरिकांनी वेळेत फॉर्म भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांनीही सर्व मतदारांना या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
