सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

प्रवाशांना अडचणीच्या वेळी दिली तत्पर मदत; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

प्रवाशांना अडचणीच्या वेळी दिली तत्पर मदत; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

सामाजिक
नांदेड| प्रवाशांना केवळ त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविणे एवढेच नव्हे, तर अडचणीच्या प्रसंगी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करणे, हेही महाराष्ट्राच्या एसटी सेवेचे वैशिष्ट्य आहे. याची प्रचिती शुक्रवारी सकाळी नांदेड–देगलूर मार्गावर आली. ट्रॅव्हल्स बस खराब झाल्यामुळे रस्त्यावर ताटकळत उभ्या असलेल्या पंजाबमधील सुमारे ३० महिला प्रवाशांना ‘शिवाई’ बसच्या चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रकांनी तत्परतेने मदत करून सुखद अनुभव दिला. शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंजाब येथील सुमारे ३० महिला प्रवासी प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये अचानक बिघाड झाला. वाहन रस्त्यातच बंद पडल्याने महिला प्रवाशांना बराच वेळ अडचणींचा सामना करावा लागत होता. अनोळखी ठिकाणी, वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली होती. याचवेळी नांदेड–देगलूर मार्गावर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसचे चालक राजे...
खडकी फाटा–खडकी बाजार रस्ता खड्ड्यांत; प्रवाशांचा जीव टांगणीला

खडकी फाटा–खडकी बाजार रस्ता खड्ड्यांत; प्रवाशांचा जीव टांगणीला

सामाजिक
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त; तातडीने दुरुस्तीची मागणी हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाटा ते खडकी बाजार गावापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. रस्ता दुरुस्तीअभावी वाहनांचे नुकसान होत असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत....
देगलूरातील एकमेव आधार केंद्र चार महिन्यांपासून बंद; नागरिकांची हेळसांड

देगलूरातील एकमेव आधार केंद्र चार महिन्यांपासून बंद; नागरिकांची हेळसांड

सामाजिक
आधार केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा पोस्ट कार्यालयाला घेराव; कुलूप ठोकून आंदोलनाचा इशारा देगलूर, प्रतिनिधी| देगलूर तालुक्यातील पोस्ट कार्यालयात सुरू असलेले एकमेव आधार नोंदणी केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीअभावी शैक्षणिक तसेच विविध शासकीय कामे खोळंबत असल्याने हे केंद्र तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देगलूर पोस्ट कार्यालयाला घेराव घातला. यावेळी पोस्ट ऑफिसर पवार यांना निवेदन देत नांदेडच्या मुख्य पोस्ट ऑफिसर कुलकर्णी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. आधार केंद्र तातडीने सुरू न केल्यास पोस्ट कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला. देगलूर हे तेलंगणा, कर्नाटक व आंध्र ...
मारोती मंदिर परिसरातील सी.सी. रस्त्याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करा; अतुल काळे यांची मागणी

मारोती मंदिर परिसरातील सी.सी. रस्त्याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करा; अतुल काळे यांची मागणी

सामाजिक
निकृष्ट कामाचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराचे अंतिम देयक रोखण्याची मागणी हदगाव | हदगाव नगरपरिषदेच्या अंतर्गत आठवडी बाजारातील मारोती मंदिर परिसरात करण्यात आलेल्या सी.सी. रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामाची स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे हदगाव शहरप्रमुख अतुल काळे यांनी केली आहे. याबाबत काळे यांनी हदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप आणि बांधकामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एम.बी.मधील नोंदीशी प्रत्यक्ष मोजमापाची पडताळणी करा तक्रारीत रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी प्रत्यक्ष मोजून ती Measurement Book (M...
पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्या कुटुंबीयांचे माजी आमदार जवळगावकरांकडून सांत्वन

पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्या कुटुंबीयांचे माजी आमदार जवळगावकरांकडून सांत्वन

सामाजिक
खडकी बु. येथे निवासस्थानी भेट देत व्यक्त केला शोक; देवराव हनवते यांच्या निधनाने हळहळ हिमायतनगर,प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील खडकी बु. येथील पत्रकार शुद्धोधन हनवते यांचे वडील तथा रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी देवराव रूपाजी हनवते यांचे ११ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हनवते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. निधनाची माहिती मिळाल्यानंतर हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बुधवार, १९ ऑगस्ट रोजी खडकी बु. येथे पत्रकार शुद्धोधन हनवते यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी हनवते कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून दुःखात सहभागी होत सांत्वन केले. देवराव हनवते यांनी रेल्वे विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावून सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिचिता...
वॉर्ड क्रमांक १७ मधील रस्ता व नाल्यांच्या दुरवस्थेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष – माजी नगरसेविका सौ. सुरेखा सातव

वॉर्ड क्रमांक १७ मधील रस्ता व नाल्यांच्या दुरवस्थेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष – माजी नगरसेविका सौ. सुरेखा सातव

सामाजिक
रेल्वे स्थानक रस्त्यावर अपघाताचा धोका वाढल्याने तातडीने दुरुस्ती व नालेसफाईची मागणी हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक १७ मधील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिवराव सातव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात वॉर्ड क्रमांक १७ मधील रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. पावसामुळे रस्त्यावरील ख...
नांदेड रेल्वे विभागात पाणी गुणवत्तेवर कडक नजर; सात महिन्यांत १,०२९ नमुन्यांची जैविक तपासणी

नांदेड रेल्वे विभागात पाणी गुणवत्तेवर कडक नजर; सात महिन्यांत १,०२९ नमुन्यांची जैविक तपासणी

सामाजिक
२२ हजारांहून अधिक अवशिष्ट क्लोरीन तपासण्या; एकाही पाणी नमुन्यात असमाधानकारक गुणवत्ता आढळली नाही नांदेड | प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतापूर्ण खाद्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून पाणी गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. कॅग अहवालातील निरीक्षणांमध्ये नांदेड विभागातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर दूषित पाणी आढळल्याचे नमूद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये ९ आरोग्य निरीक्षकांचे समर्पित पथक कार्यरत असून, रेल्वे वैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाणी गुणवत्ता आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी केली जाते. सात महिन्यांत हजारो नमुन्यांची तपासणी - पाणी गुणवत्तेच्या नियमित निरीक्षणाअंतर्गत पाण्याचे नमुने घेऊन ...
देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीमय वातावरणात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीमय वातावरणात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सामाजिक
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. वंदे मातरम् गीतानंतर आमदार जितेश अंतापूरकर व उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने ध्वजाला मानवंदना देत सलामी देण्यात आली. यावेळी महसूल, पोलीस व विविध शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच देगलूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव पडवळ, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, मुख्याधिकारी नीलम कांबळे, नायब तहसीलदार सरकलवाड गिरीश, गणेश रायेवार, बीईओ बालाजी गोडाजी, हामिद दौलताबादी, तलाठी रातोळीकर यांच्यासह विविध विभागा...
नांदेड पतंजली योगपीठ परिवारातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड पतंजली योगपीठ परिवारातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सामाजिक
संकल्प यज्ञातून योग विस्ताराचा निर्धार; कैलास नगर हनुमान मंदिर परिसरात ध्वजारोहण नांदेड, प्रतिनिधी| नांदेड पतंजली योगपीठ परिवाराच्या वतीने कैलास नगर येथील हनुमान मंदिर परिसरात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी योगसाधना, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्वांच्या उपस्थितीत संकल्प यज्ञाने करण्यात आली. प्रत्येक वार्ड व नगर परिसरात नि:शुल्क योग शिबिरे आयोजित करणे, योगाचा अधिकाधिक विस्तार करणे तसेच योगसाधना घरोघरी पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. या प्रसंगी पतंजली योगपीठ परिवाराचे का...
सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे रंगतदार समापन

सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे रंगतदार समापन

सामाजिक
आठ राज्यांसह रशियातील कलाकारांचा सहभाग; तृतीयपंथी सक्षमीकरण, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक वैविध्याचा अनोखा संगम नांदेडमध्ये तीन दिवस रंगला भारतीय कला-संस्कृतीचा भव्य उत्सव नांदेड, प्रतिनिधी| भारतीय संस्कृती, लोककला, सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती आणि सर्वसमावेशक विकासाचा अनोखा संगम घडविणारा ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव–२०२६’ नांदेडच्या कुसुम सभागृहात १४, १५ आणि १६ ऑगस्टदरम्यान अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. सप्तरंग सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन नांदेड, विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील नृत्य व संगीत स्पर्धा, लोककला सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, भव्य मोफत आरोग्य शिबिर, तृतीयपंथी सक्षमीकरण चर्चासत्र, रोजगार व स्वयंरोजगार उपक्रम, पुरस्का...
error: Content is protected !!