आ. बाबुराव कदम यांच्या हस्ते हदगाव आगारात चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण

प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव

हदगाव, गौतम वाठोरे| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हदगाव आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या चार ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बससेवेमुळे मतदारसंघातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नवीन बसगाड्यांच्या आगमनामुळे हदगाव आगाराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून, प्रवाशांना आधुनिक सुविधांसह सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता एसटी महामंडळाने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आगारप्रमुख धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य ढोले बापू, नगराध्यक्ष प्रतिनिधी भास्कर वानखेडे, शहरप्रमुख बबन माळोदे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, देशमुख काका, नगरसेवक गोपाल सारडा, नामदेव वाकोडे, पांडुरंग जाधव, बालाजी शिंदे, नगरसेवक प्रतिनिधी बालाजी राठोड, बबन कदम, गजानन मस्के, गजानन पतंगे, शरद कदम, अशोक पवार, सुभाष पवार, दिनेश मेहत्रे, राम सूर्यवंशी, विजय शिंदे, आदिल खान, अल्ताफ खान यांच्यासह आगारातील अधिकारी-कर्मचारी, शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या उपक्रमाचे प्रवासी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नव्या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!