हिमायतनगरचे योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे निधन

हिमायतनगर | हिमायतनगर येथील योगी पीठाचे मानद योगगुरू परमेश्वर पानपट्टे यांचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने योगसाधना क्षेत्रासह हिमायतनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता लकडोबा चौक येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजई, मुलं, असा मोठा परिवार आहे.

योगसाधना आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत. स्व. परमेश्वर पानपट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!