सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे

नांदेड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे

सामाजिक
महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन; तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून नोंदी व कागदपत्रांची पडताळणी नांदेड| जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, तिच्या अंमलबजावणीत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. या शिबिरांसाठी प्रत्येक महसूल मंडळात तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे. जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे तसेच आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून परिपूर...
देगलूरमध्ये कडकडीत बंद; जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाचा एल्गार

देगलूरमध्ये कडकडीत बंद; जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाचा एल्गार

सामाजिक
देगलूर, गंगाधर मठवाले| मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने देगलूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, व्यावसायिक, युवक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्याने नेहमी गजबजणाऱ्या देगलूर शहरात शुकशुकाट दिसून आला. मराठा समाजाच्या आरक्षणासह कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्रे आणि अन्य प्रलंबित मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. शासनाचे लक्ष या मागण्यांकडे वेधण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. बंददरम्यान सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आपला ...
जन्मतारखेच्या कागदासाठी वृद्धांची फरपट; पेन्शनच्या हक्कालाच कागदपत्रांचा फास!

जन्मतारखेच्या कागदासाठी वृद्धांची फरपट; पेन्शनच्या हक्कालाच कागदपत्रांचा फास!

सामाजिक
६०-७० वर्षे जगलेल्या निराधारांकडे जन्मदाखला कुठून येणार? श्रावणबाळ योजनेतील नव्या अटीने लाभार्थी हैराण देगलूर, गंगाधर मठवाले| आयुष्याची उमेदीची वर्षे कष्टात घालवून आता शासनाच्या आधारावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसमोर पेन्शन मिळविण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण भागातील अनेक वृद्धांच्या जन्माची नोंदच उपलब्ध नसताना जन्म प्रमाणपत्र किंवा जुने शैक्षणिक दस्तऐवज सादर करण्याची अट घालण्यात आल्याने निराधार लाभार्थ्यांची अक्षरशः फरपट सुरू झाली आहे. गरीब, निराधार, वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसह विविध सामाजिक सुरक्षा योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना लाभार्थ्यांची दमछाक होत आहे. योजनेचा लाभ मिळविण्यापेक्षा कागदपत्रे जमविणेच मोठे आव्हान ठर...
कुणबी मराठा महासंघाच्या वतीने महापौर कविता मुळे यांचा हिमायतनगरात जंगी सत्कार

कुणबी मराठा महासंघाच्या वतीने महापौर कविता मुळे यांचा हिमायतनगरात जंगी सत्कार

सामाजिक
फटाक्यांची आतषबाजी व भव्य पुष्पहाराने केले उत्स्फूर्त स्वागत हिमायतनगर, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांचे हिमायतनगर शहरात आगमन होताच कुणबी मराठा महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच हिमायतनगर शहरात आगमन झाल्याने महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी महापौर सौ. कविता मुळे यांचा कुणबी मराठा महासंघाच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक प्रजावाणीचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद करवा यांचाही यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक तुजलैश यादव, साहेबराव गायकवाड, अभिषेक सौदे, सुमित मुथा, भालचंद्र पवळे, अपूर्व देशमुख आदी उपस्थित होते. हा कार्यक्र...
हिमायतनगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

हिमायतनगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

सामाजिक
ढोल-ताशांचा गजर अन् लेझीमच्या तालावर चिमुकल्यांचे लक्षवेधी सादरीकरण हिमायतनगर, प्रतिनिधी| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शोभायात्रेदरम्यान चिमुकल्या शालेय विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालामुळे शहरातील वातावरण अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्साहाने भारावून गेले होते. नागरिकांनीही या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शोभायात्रेत सहभागी नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याचे स्मरण केले. ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे...
जरांगे पाटलांच्या लढ्याला साथ देण्यासाठी दत्ता पाटील पुन्हा रणांगणात!

जरांगे पाटलांच्या लढ्याला साथ देण्यासाठी दत्ता पाटील पुन्हा रणांगणात!

सामाजिक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा एल्गार हदगाव, प्रतिनिधी| मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते दत्ता पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा देत दत्ता पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून हदगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर चर्चेत आहे. आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलने झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत दत्ता पाटील यांनी हदगाव ये...
निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; आमरण उपोषण मागे

निपाणी सावरगावच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; आमरण उपोषण मागे

सामाजिक
रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; प्रशासनाच्या आश्वासनाकडे ग्रामस्थांचे लक्ष देगलूर, गंगाधर मठवाले| निपाणी सावरगाव येथील स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठणकर यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न प्रशासनाच्या पातळीवर मांडण्यात आला. निपाणी सावरगाव येथे ग्रामस्थांसाठी स्मशानभूमीची योग्य जागा उपलब्ध करून देण्यासह अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड, रस्ता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नासाठी आकाश पाटील कोकणे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होत...
मातृतीर्थ तलावात भाविकाचा बुडून मृत्यू; रानडुकराच्या हल्ल्यात दुसरा जखमी

मातृतीर्थ तलावात भाविकाचा बुडून मृत्यू; रानडुकराच्या हल्ल्यात दुसरा जखमी

सामाजिक
२५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आंघोळीसाठी तलावात उतरला; सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले श्रीक्षेत्र माहूर | राज ठाकूर| माहूरगडावर भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन परिक्रमा यात्रेला दोन दुर्दैवी घटनांनी गालबोट लागले. परिक्रमा यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या २८ वर्षीय भाविकाचा मातृतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत अनुसया माता मंदिर परिसरातील जंगलात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात ३५ वर्षीय भाविक जखमी झाला. या दोन्ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडल्या. २५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केली अन् काळाने घात केला वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गायवळ येथील अनिकेत वाल्मिक तूरक (वय २८) हा आपल्या मित्र, बहीण, पुतण्या यांच्यासह सुमारे १० ते १२ भाविकांसोबत २७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन परिक्रमा यात्रेनिमित्त माहूर...
नांदेड मनपातर्फे एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू करावी : भाजपा गजानन जोशी

नांदेड मनपातर्फे एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू करावी : भाजपा गजानन जोशी

सामाजिक
नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून, त्याची नांदेड महानगरपालिकेत प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजानन जोशी यांनी केली आहे. नगर परिषद संचालनालयामार्फत राज्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायत तसेच महानगरपालिकांना एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याबाबत सूचनापत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांची नोंदणी करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पथक गठीत करावे, असेही सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सदिच्छा सोनी यांना निवेदन देऊन प्रभागनिहाय एकल महिला सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी पथके गठीत करण्याची...
आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीचा समितीकडून आढावा

आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीचा समितीकडून आढावा

सामाजिक
नांदेड | आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. योजनांच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा यांनी प्रशासनाला दिले. महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने दि. १९ ते २१ ऑगस्टदरम्यान नांदेड जिल्ह्याचा दौरा करून आदिवासीबहुल भागातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर नांदेड येथील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत जातपडताळणी, वनहक्क दावे, आदिवासींच्या जमिनी, शिक्षण, आश्रमशाळा, वसतिगृहे तसेच आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासींसाठी राखीव असलेली पदे रिक्त राहू नयेत,...
error: Content is protected !!