महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी द्या; सदाभाऊ खोत यांची अंदाज समितीत मागणी

नंदगिरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी द्या; सदाभाऊ खोत यांची अंदाज समितीत मागणी

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या नंदगिरी किल्ला च्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना अंदाज समितीचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी झालेल्या समिती बैठकीत केली. नंदगिरी किल्ला हा नांदेड जिल्ह्याचा प्राचीन ठेवा असून काही वर्षांपूर्वी तो नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी गडप्रेमींना एकत्र करून ‘किल्लेदारांची फौज’ उभी केली. गेल्या तीन वर्षांपासून दर रविवारी मोहिमा राबवत किल्ल्याचे संवर्धन करण्यात आले आणि शासनाचे लक्ष या ठिकाणी वेधले गेले. किल्ल्याच्या विकासासाठी शासनाकडून सुमारे 6 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. अलीकडेच नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी, शस्त्रास्त्रे व आयुधे यांचे तीन दिवसीय प्रदर्शन आयो...
सरसम–हिमायतनगर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

सरसम–हिमायतनगर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

महाराष्ट्र
हिमायतनगर| सरसम ते हिमायतनगर मार्गावरील म्हसोबा नाल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे शुक्रवार दिनांक 10 रोजी रात्री 8 वाजता मोटरसायकलवरून हिमायतनगरहून सरसम गावाकडे जात होते. दरम्यान, भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर आणि अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सरसम–हिमायतनगर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्म...
हिमायतनगर तालुक्यातील निकृष्ट कामांची पोलखोल होणार का?

हिमायतनगर तालुक्यातील निकृष्ट कामांची पोलखोल होणार का?

महाराष्ट्र, स्थानिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नांदेड जिल्ह्यात सुरू असून, लवकरच समिती हिमायतनगर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, समिती या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य समोर आणणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पैंगनगा नदीवरील कोठा, घारापूर आदी ठिकाणी उच्च पातळी बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. तसेच जलसंधारण विभागाकडून कामारी, एकघरी, वडगाव परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत बंधारे उभारले जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे शासनाच्या विकासाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. याशिवाय ...
हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!

महाराष्ट्र, स्थानिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जमिनीचे प्लाॅट पाडून विक्री करणाऱ्या मालकांनी मुळ लेआऊट मध्ये दाखविलेले रस्ते ओपन स्पेस ही प्लाॅट पाडून त्याची विक्री केली आहे. परिणामी अनेक ओपन स्पेस आता गायब झाले आहेत. या बाबतीत संबंधित प्रशासनाची उदासीनता अश्या प्रकारच्या गैर प्रकारांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. रस्ते ओपन स्पेस दाखवून नगररचना कार्यालयाकडून लेआऊट मंजूर करून घ्यायचे आणी नंतर परस्पर फेरबदल करून रस्ते आणी ओपन स्पेस ची परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली. हिमायतनगर शहराची हद्दवाढ होवून आजूबाजूचा खुप मोठा भाग हा नगरपंचायतीच्या हद्दीत आलेला आहे. व तसेच शहराचे विस्तारीकरण ही वेगाने सुरू आहे. नवीन वसाहतीत अनेकांनी जमीनी विकत घेऊन त्याचे प्लाॅट पाडून ते विक्री...
नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आता ‘डिजिटल’ पाळत!

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आता ‘डिजिटल’ पाळत!

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. या मार्गावर अत्याधुनिक 'अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरील अपघातांना आळा बसण्यासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर डिजिटल पद्धतीने वचक बसणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मात्र, सतत गंभीर अपघात होत असलेल्या या महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान खा. चव्हाण यांनी नांदेड ते पार्डी मक्ता या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ...
उन्हाळी गर्दीसाठी कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस; नांदेड मार्गे धावणार

उन्हाळी गर्दीसाठी कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस; नांदेड मार्गे धावणार

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेने, दक्षिण मध्य रेल्वेच्या समन्वयाने, कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे दक्षिण व उत्तर भारतातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक 06181 कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 9 एप्रिल ते 4 जून 2026 या कालावधीत दर गुरुवारी पहाटे 2.30 वाजता कोयंबतूर येथून सुटून शनिवारी दुपारी 1.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल. या दरम्यान एकूण 9 फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06182 जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 12 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत दर रविवारी रात्री 10.05 वाजता जयपूरहून सुटून बुधवारी सकाळी 8.30 वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. या गाडीच्याही 9 फेऱ्या नियोजित आहेत. या विशेष गाडीत 20 एलएचबी डबे असतील. त्यामध्ये 18 वातानुकूल...
टाकराळा बु. येथे भीषण अपघात; जिप्सीला मागून धडक, 10 जण गंभीर जखमी

टाकराळा बु. येथे भीषण अपघात; जिप्सीला मागून धडक, 10 जण गंभीर जखमी

महाराष्ट्र
हिमायतनगर/वडगाव| तालुक्यातील टाकराळा बु. बस स्टॉपजवळ सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला. विवाह सोहळा आटोपून दरेगावकडे परतणाऱ्या जिप्सी टेम्पोला वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्य आंध्र प्रदेशातील निर्मल येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकराळा बु. येथे त्यांच्या जिप्सी टेम्पोला मागून येणाऱ्या वीट भरलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेनंतर जिप्सी पलटी झाली, मात्र धडक देणाऱ्या टेम्पोने वेळीच ब्रेक न लावता सुमारे 40 ते 50 फूट वाहन फरफटत नेल्याने अपघाताचे गांभीर्य वाढले. या अपघातात महिलांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून एकूण 15 प्रवाशांपैकी 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक...
तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

महाराष्ट्र
केज/माहूर| केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने महसूल प्रशासनासह केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये त्यांनी माहूर येथे तहसीलदार तसेच नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे ...
तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नांदेडमध्ये दिव्यांगांचा एल्गार

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नांदेडमध्ये दिव्यांगांचा एल्गार

महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात नांदेडमध्ये दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत “आम्हाला गुंडगिरी नको, मुंढेंसारखा प्रामाणिक अधिकारी हवा” अशी भूमिका मांडली. कडक उन्हाची पर्वा न करता मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव हातात फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नांदेड दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीलाही आंदोलकांनी घेराव घालत आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. निवेदनात मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करावी, संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मा...
नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज “डिजिटल अवेअरनेस डे” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांमध्ये डिजिटल पेमेंटबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम आणि आदिलाबादसह इतर स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत डिजिटल व्यवहारांचे फायदे, सुरक्षितता आणि सोय यांची माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत डिजिटल पेमेंटचा संदेश दिला. दरम्यान, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून तिकीट खरेदीसह रेल्वे सेवांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारून...
error: Content is protected !!