
नांदेड| परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रस्ते अपघात व मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मार्फत अतिवेग, मद्यपान करून वाहन चालविणे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.



आरटीओच्या इंटरसेप्टर वाहनांवरील रडार कॅमेऱ्यांद्वारे भरधाव वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील अपघातांपैकी सर्वाधिक अपघात सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुकानिहाय सखोल अभ्यास करण्यात आला.



तालुकानिहाय सर्वेक्षण आणि विश्लेषण – फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत आरटीओच्या 32 अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचे सर्वेक्षण केले. अपघातस्थळांचे Geo Tagging, कारणांचे विश्लेषण, उपाययोजनांसह अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष Rahul Kardile यांना सादर करण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
अपघातांमध्ये लक्षणीय घट – प्राणांतिक अपघातांमध्ये 24.38% घट (फेब्रुवारी 2026 पर्यंत), जानेवारी-फेब्रुवारी 2026 दरम्यान मृत्यूदरात 15.85% घट
