महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

चना खरेदीला अचानक ब्रेक; शेतकऱ्यांवर सुलतानी संकट, पणन यंत्रणेचा गोंधळ उघड

चना खरेदीला अचानक ब्रेक; शेतकऱ्यांवर सुलतानी संकट, पणन यंत्रणेचा गोंधळ उघड

शेती
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| लग्नसराईचा हंगाम, पैशांची तीव्र गरज आणि त्याच वेळी चना खरेदीला अचानक ब्रेक लागल्याने कुंडलवाडी परिसरातील शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडले आहेत. पणन यंत्रणा व NCCF यांच्या समन्वयाच्या अभावामुळे खरेदी प्रक्रिया ठप्प झाली असून, भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. “शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले” या कारणावर ऑनलाइन फोल्डर बंद करत खरेदी थांबवण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. सातबाऱ्याच्या आधारे सुरू असलेली खरेदी प्रक्रिया अचानक थांबल्याने हमीभावाच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. आधीच बाजारभाव अनिश्चित असताना शासनाच्या खरेदीवर विसंबून राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, वखार व्यवस्थापनावर गंभीर आरोपही पुढे आले आहेत. काही कर्मचाऱ्यांकडून “पैसे दिल्याशिवाय गाड्या रिकाम्या होत नाहीत” असा आरोप शेतकरी करत असून, पैसे न दि...
खत टंचाई, लिकिंग व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर धडक तपासणी

खत टंचाई, लिकिंग व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर धडक तपासणी

शेती
नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत व योग्य दरात पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक धडक तपासणी केली. नवीन मोंढा परिसरातील वसुंधरा फर्टीलायझर्स तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे भेट देत त्यांनी साठा, विक्री प्रक्रिया आणि नोंदींची सखोल पडताळणी केली. तपासणीदरम्यान विक्रेत्यांचे परवाने, साठा रजिस्टर, ई-पॉस मशीन यांची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉसवरील आकडे जुळतात का, याची खात्री करण्यात आली. तसेच खत विक्रीची बिले तपासून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केली आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ई-पॉस मशीनशिवाय खत विक्री करू नये, कृत्रिम टंचाई निर्माण करू नये आणि साठेबाजी टाळावी. युरिया व डीएपी खतांच्या विक्रीवर विशेष लक्...
हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; आयशर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर

हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; आयशर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर

महाराष्ट्र
हिमायतनगर| हिमायतनगर -सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयचर ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला आहे. या घटनेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हिमायतनगर शहरातील शासकीय धान्य गोदामातून मौजे कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH26-7776 ने सिरपल्ली–सिरंजनी मार्गे येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH29-AZ 4538 ला जोरदार धडक दिली. ही घटना एचपी गॅस गोडाऊनसमोर मुख्य रस्त्यावर घडली. या अपघातात दुचाकिवरील गणेश सदाशिव जाधव वय 55 वर्ष राहणार सिरपल्ली जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील शंकर विठ्ठल वानखेडे वय 40 वर्ष रा सिरपल्ली हि व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अपघात एवढा भयंकर होता की आयचर ट्रकच्या समोरील भागात दुचाकी अडकल्याचे घटनास्थळी दिसत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णाल...
भोकरमध्ये जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण; शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धतेवर भर

भोकरमध्ये जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण; शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धतेवर भर

महाराष्ट्र
भोकर/नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल.” सहकार चळवळीचा वारसा जपत सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भूषवले. यावेळी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी श्यामराव कदम आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज...
नांदेड पिक विमा योजनेअंतर्गत ८१३.९३ कोटींची नुकसानभरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

नांदेड पिक विमा योजनेअंतर्गत ८१३.९३ कोटींची नुकसानभरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

शेती
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ मधील पिक नुकसानीसाठी तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या रकमेचे वितरण २१ एप्रिल २०२६ पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांनी एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल केले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीत सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकांचा सर्वाधिक फटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली असून सो...
नांदेड हजूर साहिब–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ६ तास उशिराने सुटणार

नांदेड हजूर साहिब–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ६ तास उशिराने सुटणार

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| येथून सुटणाऱ्या हजूर साहिब नांदेड हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांना मोठा विलंब सहन करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07621 ही एक्सप्रेस 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:45 वाजता सुटण्याचे नियोजित होते. मात्र आता ही गाडी तब्बल 360 मिनिटे (6 तास) उशिराने म्हणजेच दुपारी 2:45 वाजता नांदेड स्थानकातून रवाना होणार आहे. या विलंबामागचे कारण म्हणजे संबंधित लिंक ट्रेन क्रमांक 07702 ही एक्सप्रेस सुमारे 484 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मुख्य गाडीच्या वेळापत्रकावर झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळेनुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे....
केंद्रीय विद्यालय विभागीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजेचा सुवर्णवेध

केंद्रीय विद्यालय विभागीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजेचा सुवर्णवेध

क्रीडा
नांदेड| केंद्रीय विद्यालयाच्या वतीने पुणे येथे आयोजित विभागीय आर्चरी स्पर्धेत नांदेड येथील केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत नागरगोजे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. मुंबई विभागाच्या केंद्रीय विद्यालयांतर्गत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील ही विभागीय स्पर्धा २२ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात अनिकेत ज्ञानोबा नागरगोजे याने अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अनिकेतने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल बोरीवाले यांना दिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय विद्यालय नांदेडचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, मुख्याध्यापक राम सर तसेच क्रीडा शिक्षक दीपक कुमार, प्रशांत सर आणि इतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. अनिकेतच्या या यशामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्ष...
 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

लेख, शेती
वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ  'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान  पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणज...
दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

माहिती, शेती
पुणे| महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा असून राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा सुमारे २.८ टक्के, तर कृषी उत्पन्नात तब्बल २५.१ टक्के वाटा आहे. वाढती लोकसंख्या, वाढणारी श्रमशक्ती आणि दुधाची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत आहे. दुग्ध उत्पादनात वाढीची मोठी संधी - सध्या महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे वार्षिक उत्पादन १६.६२ MMT आहे. मात्र, प्रति व्यक्ती आवश्यक ३५८ ग्रॅम दुधाच्या तुलनेत सध्या केवळ ३०० ग्रॅम उपलब्धता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी दुग्धव्यवसायात मोठी संधी निर्माण झाली आहे. उद्योजकतेकडे वाटचाल - पारंपारिक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिल्या जा...
आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

माहिती, लेख
पुणे| शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असून कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा हा व्यवसाय ‘एटीएम’सारखा ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने ग्रामीण तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे हा व्यवसाय अधिक सक्षम होत असून स्वयंरोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. स्वयंरोजगाराचा प्रभावी पर्याय ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन हा एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय ठरत आहे. ‘सेमी-स्टॉल फीडिंग’ (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय अधिक फायदेशीर केला जात आहे. विशेष म्हणजे, घरातील महिला देखील हा व्यवसाय सांभाळून स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न मिळवू शकतात. शेळी व मेंढी को...
error: Content is protected !!