महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

खड्ड्यांतून प्रवास, टोल मात्र कायम! महामार्गावर झाडे नसल्याने नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर/भोकर (प्रतिनिधी) एकीकडे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे सुरूच असलेली टोल वसुली… यामुळे वाहनधारकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सरसम म्हसोबा नाण्यापासून पुढे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. वाहनधारकांच्या मते, रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू ठेवणे हा सरळसरळ अन्याय आहे. “सुविधा शून्य, शुल्क पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. दरम्यान, भोकर–हिमायतनगर (१६१ ए) राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली; मात्र त्यानंतरची वृक्षलागवड आणि संगोपन पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. परिणामी...
खताने भरलेला भरधाव ट्रक गतिरोधकास धडकला.!मोठा अनर्थ टळला

खताने भरलेला भरधाव ट्रक गतिरोधकास धडकला.!मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र
कंधार (सचिन मोरे) खताने भरलेला भरधाव वेगात लोह्या कडून कंधार कडे येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने वेगवान ट्रक महाराणा प्रताप चौकातील गतिरोधकावर धडकला. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले. मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले. याबाबत प्रत्यक्ष दर्शनी नागरिकाकडून मिळालेली माहिती अशी की, ५ मे रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान लोह्याकडून भरधाव वेगात खतांनी भरलेला ट्रक क्रमांक एमएच १२ एनएक्स १९६९ या क्रमांकाचा खतांनी भरलेला ट्रक कंधार कडे येत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंग अवधान राखत ट्रकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना दगडसांगवी हून कंधारकडे परत येणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०४८ या बस ची महाराणा प्रताप चौकामध्ये समोरासमोर टक्कर होताहोता टळली. ट्रक चालकाने प्रसंग अवध...
नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

महाराष्ट्र
पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज नांदेड| जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सन २०२५-२६ या कालावधीसाठी व्यापक कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून जानेवारी ते मार्च २०२६ आणि एप्रिल ते जून २०२६ या कालावधीसाठी एकूण सुमारे ५१.५८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी २४.१७ दलघमी, नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी ४९.०४ दलघमी, तर नगर परिषद क्षेत्रासाठी २६.७६१ दलघमी असे एकूण ९९.९७१ दलघमी पाणी विविध धरणे व जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आले आहे. पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात...
हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

महाराष्ट्र
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असताना, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही काही ग्राहकांना जादा दर घेऊन दोन-दोन कॅनमध्ये डिझेल दिले जात असल्याचा आरोप आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता “पंप स्लो चालू आहे” असे कारण दिले जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर चालक व शेतकऱ्यांना डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र, शेतीच्या नावाखाली डिझेलचा साठा करून त्याची अवैध विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. वाहनधारका...
विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

क्रीडा
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. १५ ते २९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.०० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पार पडणार आहे. या शिबिरासाठी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, क्लब, अकादमी तसेच क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी आपण घेऊ इच्छित असलेल्या खेळांचे नाव, प्रशिक्षणाचे स्थळ व वेळ (सकाळ/सायंकाळ) नमूद करून लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र द...
केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

शेती
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याबरोबरच खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे....
माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना पद्मश्री देण्याची मागणी; नांएसोच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांचा सूर

माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना पद्मश्री देण्याची मागणी; नांएसोच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांचा सूर

महाराष्ट्र
नांदेड| सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली. डॉ. काब्दे यांच्या निवृत्ती निमित्त नांदेड एज्युकेशन सोसायटीतर्फे पुरणमल लाहोटी सभागृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन अध्यक्ष सीए (डॉ.) प्रवीण पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, कार्यकारिणी सदस्य ॲड. चिरंजीलाल दागडिया, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. काब्दे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर द...
मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शेती
नांदेड| जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्र...
नांदेड विभागात रेल्वे सेवांचा विस्तार; नवीन गाड्या सुरू, काहींचे नियमितीकरण

नांदेड विभागात रेल्वे सेवांचा विस्तार; नवीन गाड्या सुरू, काहींचे नियमितीकरण

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. South Central Railway मार्फत विविध विशेष गाड्यांचे नियमितीकरण, नवीन गाड्यांची सुरूवात तसेच विद्यमान गाड्यांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर हे बदल लागू करण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून नांदेड – तिरुचानूर – नांदेड (17633/17634) ही साप्ताहिक एक्सप्रेस 09 मे 2026 पासून सुरू होणार आहे. तसेच जालना – तिरुचानूर – जालना (17637/17638) ही साप्ताहिक एक्सप्रेस 11 मे 2026 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दोन्ही गाड्या महत्त्वाच्या स्थानकांमार्गे धावणार असून मराठवाडा व आंध्रप्रदेश यांदरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय, पूर्वी स्पेशल म्हणून धावणारी पूर्णा – जालना – नांदेड (77623/77624) डेमू पॅसेंजर सेवा आता नियमित करण्यात आली असून 04 मे 2026 ...
नांदेडमध्ये ‘एचपीसीएल’चे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार

नांदेडमध्ये ‘एचपीसीएल’चे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार

महाराष्ट्र
नांदेड|  जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या तेल कंपनीने नांदेडमध्ये आपले नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या एकूण ७ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांतील सुमारे ३०० पेट्रोल पंप आता थेट नांदेड कार्यालयाशी जोडले जाणार आहेत. यापूर्वी हे सर्व जिल्हे सोलापूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत येत होते.  भौगोलिक अंतर आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता नांदेडमध्ये स्वतंत्र कार्यालयाची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, ती आता पूर्ण झाली आहे. दरम्यान, एचपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कुमार आणि क्षेत्र विक्री व्यवस्थापक तन्मय कोमटी यांनी Ashok Chavan यांची सदिच्छा भेट घेत नवीन कार्...
error: Content is protected !!