पुणे विभागातील दुहेरीकरण कामामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग तात्पुरते बदलले

नांदेड| मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अकोलनेर–अहिल्यानगर–निंबळक दरम्यान दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

या बदलानुसार पुढील गाड्या परिवर्तित मार्गाने धावणार आहेत :
गाडी क्रमांक 17629 हडपसर–नांदेड एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा मार्गे धावेल.
गाडी क्रमांक 17630 नांदेड–हडपसर एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड मार्गे धावेल.
गाडी क्रमांक 17323 हुबळी–बनारस एक्सप्रेस ही 15 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल.

गाडी क्रमांक 11025 पुणे–अमरावती एक्सप्रेस ही 16, 17 व 18 मे 2026 रोजी पुणे–दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा–अकोला मार्गे धावेल. गाडी क्रमांक 11026 अमरावती–पुणे एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी अकोला–पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड–पुणे मार्गे धावेल.

गाडी क्रमांक 12627 बैंगलोर–नवी दिल्ली एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल. गाडी क्रमांक 20657 हुबळी–निजामुद्दीन एक्सप्रेस ही 15 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल.

गाडी क्रमांक 20658 निजामुद्दीन–हुबळी एक्सप्रेस ही 17 मे 2026 रोजी मनमाड–छत्रपती संभाजीनगर–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–सोलापूर मार्गे धावेल. गाडी क्रमांक 11410 निजामाबाद–पुणे एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी जन्कमपेठ–पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड मार्गे धावेल. गाडी क्रमांक 11409 दौंड–निजामाबाद एक्सप्रेस ही 16 व 17 मे 2026 रोजी दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा–जन्कमपेठ मार्गे धावेल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक व मार्गातील बदलांची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रातून तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कालावधीत रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!