
छत्रपती संभाजीनगर| समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव यांच्या मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा शनिवार, 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षेसंदर्भातील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल संकेतस्थळ https://www.maharashtrasrpf.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), गेट क्रमांक 01, 03, 05 व 08, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर, चाटे स्कूल, गट क्रमांक 98, रेणुका माता मंदिर रोड, बीड बायपास, सातारा परिसर तसेच एंजल स्कूल, सातारा परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रम साळी, समादेशक तथा भरती प्रमुख, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.20, वरणगाव, जि. जळगाव (कॅम्प राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14, छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


