महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट

हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेश व निर्गमन मार्गांजवळ विखुरलेला कचरा आणि अस्वच्छतेबाबत अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची नोंद घेण्यात आली असून, हुजूर साहिब नांदेड हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार तसेच प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने परिसराची स्वच्छता आणि चांगली प्रतिमा राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. ज्या ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे ती ठिकाणे रेल्वेच्या अधिकारक्षेत्राबाहेर असून संबंधित नागरी प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित महानगरपालिका प्रशासनाशी रेल्वे अधिकाऱ्यांचा...
उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वेची घोषणा

उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वेची घोषणा

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड–निजामुद्दीन–नांदेड दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आदिलाबाद, पिंपळखुट्टी, नागपूर, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट मार्गे धावणार असून दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. गाडी क्रमांक 07660 नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वे दिनांक 22 मे 2026 रोजी नांदेड येथून सकाळी 6.35 वाजता सुटेल. ही गाडी आदिलाबाद (10:00), नागपूर (15:55), राणी कमलापती (00:10), वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (06:00), आग्रा कॅन्ट (10:45) मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07661 निजामुद्दीन–नांदेड विशेष रेल्वे दिनांक 25 मे 2026 रोजी निजामुद्दीन येथून रात्री 1.25 वाजता सुटेल. ही गाडी...
ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| पश्चिम रेल्वेने सध्या धावणारी गाडी क्रमांक 09520/09519 ओखा–मदुराई–ओखा विशेष साप्ताहिक रेल्वे नियमित करण्यात आली असून ती आता गाडी क्रमांक 19560/19559 ओखा–तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या निर्णयामुळे गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक नियमित व सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ओखा येथून 11 मे 2026 पासून दर सोमवारी रात्री 11.35 वाजता सुटणार असून द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, काचेगुडा, गडवाल, कर्नुल सिटी आणि ढोणे मार्गे बुधवारी रात्री 11.30 वाजता तिरुपती येथे पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती येथून 14 मे 2026 प...
जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

महाराष्ट्र
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (दि. 12 मे) अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागासह पंचायत समिती, गट विकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, उपकोषागार कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तहसील कार्यालयात त्यांनी महसूल विभागातील विविध कार्यासनांना भेट देत प्रत्येक विभागाच्या जाबचार्टची तपासणी केली. तसेच ‘आरटीएस’ अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे नसल्याची खात्री केली. अभिलेख कक्षालाही भेट देऊन अभिलेखांच्या नक्कल वितरण प्रक्रियेची पाहणी करत कामकाज अधिक सुलभ व प्रभावी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासकीय जमिनींच्या अभिलेख ...
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली : 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली : 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, एन.आय. अॅक्ट प्रकरणे, नांदेड वाघाळा महानगरपालिका मालमत्ता कर प्रकरणे, गुन्हा कबुली प्रकरणे, आरटीओ व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बँक व फायनान्स कंपनी प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली, बीएसएनएल व एमएसईडीसीएल कंपनीची प्रकरणे आदी विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यात एकूण 30 पॅनल तयार करण्य...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन

महाराष्ट्र
लोकाभिमुख कामांची समितीकडून पाहणी; विविध योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा हिमायतनगर | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांचे मूल्यमापन तालुका स्तरीय समितीकडून करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने ८ मे २०२६ रोजी हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या समितीत सहायक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे (भुसावळ), विस्तार अधिकारी संजोग भारती, केंद्रप्रमुख गोपाल नारायण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सपकाळे, सय्यद इकलास तसेच पत्रकार गोपीचंद सुरवाडे यांचा समावेश होता. समितीने बोरगडी, करंजी, सिरंजनी, सरसम पोटा (बु.) आणि टेंभी या ग्रामपंचायतींमधील विकासकामा...
नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

शेती
379 पैकी 177 कामे पूर्ण; भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा नांदेड | एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण ३७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १७७ कामे पूर्ण झाली असून २०२ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ६६८ मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी ८६ हजार ५८३ मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवा...
पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना कालवे व नाल्यांमधून बेकायदेशीर पाणी उपसा (पंपिंग) न करण्याचे तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचविणे सोयीचे होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई निवारणासाठी विभाग कटिबद्ध असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. ३० मार्च २०२६ च्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३.०० दलघमी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त...
हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

शेती, सामाजिक
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमा...
मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

मांजरम येथील खंडगाव पांदण अतिक्रमणमुक्त होणार – तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांचे आश्वासन

शेती
नायगाव| मांजरम येथील निजामकालीन खंडगाव पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी स्थळ पाहणीदरम्यान दिले. राज्य शासनाच्या बळीराजा पांदण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम राज्यभर सुरू असून, मांजरम येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडगाव पांदण रस्ताही याच योजनेतून विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले की, संबंधित पांदणाची लवकरच सरकारी मोजणी करण्यात येणार असून अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना शेतीसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी मंडल अधिकारी राठोड मॅडम, तलाठी अनुपवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांचा इशारा यावेळी शेतकरी नेते पांडुरंग देवराव शिंदे यांनी सांगितल...
error: Content is protected !!