महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेडच्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

नांदेडच्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवून परिसर मोकळा करण्यात आला. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने प्रस्तावित असून भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या रेखांकनानुसार महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचबरोबर नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रोडवरील मुख्य नैसर्गिक नाल्यावर झालेली अतिक्रमणेही हटवण्यात आली. बेकायदेशीर बांधकामांमुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याने परिसरात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महान...
शेतातील घराला भीषण आग; रोख रकमेसह संसार जळाला, बैलजोडी गंभीर भाजली

शेतातील घराला भीषण आग; रोख रकमेसह संसार जळाला, बैलजोडी गंभीर भाजली

महाराष्ट्र
पवना येथील अल्पभूधारक शेतकऱ्यावर संकटांचा डोंगर; पाच लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकरी बालाजी यादवराव राऊत यांच्या शेतातील राहते घर व आखाड्याला लागलेल्या भीषण आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, शेतीची अवजारे आणि रोख रक्कमेसह सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन बैल गंभीररीत्या भाजल्याने शेतकरी कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. तेलंगणा बॉर्डरला लागूल जंगलाच्या काठी वसलेल्या मौजे पवना शिवारातील गट क्रमांक ४९ मध्ये बालाजी राऊत यांचे शेत असून ते कुटुंबासह शेतातच वास्तव्यास असतात. मात्र १७ मेच्या रात्री कुटुंब गावातील घरी गेले असताना शेतातील घर व आखाड्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण घर व आखाडा आपल्या विळख्यात घेतला. या आगीत घरात ...
प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

प्रत्येक शेतकऱ्याला दोनच पोती खत? हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या भूमिकेविरोधात संताप

शेती
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यात खत वितरणावरून शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दोनच पोती खत द्यावे” असा आदेश खत विक्रेत्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ एकर शेती असो किंवा १० ते २० एकर शेती असलेला शेतकरी असो, सर्वांना समान प्रमाणात केवळ दोनच पोती खत देणे अन्यायकारक आहे. “जमीन जास्त, पीक जास्त आणि गरज जास्त असताना खत मात्र समान कसे?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार खत वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी Farmer ID आणि नियंत्रण प्रणाली लागू करण्याबाबत हालचाली...
उष्णतेचा पारा वाढला; नांदेड रेल्वे स्थानकावरील रिकाम्या बोगीला आग, मोठी दुर्घटना टळली

उष्णतेचा पारा वाढला; नांदेड रेल्वे स्थानकावरील रिकाम्या बोगीला आग, मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड | नांदेड येथील हजूर साहेब रेल्वे स्थानकावर गुरुवार दि. 21 मे रोजी सकाळी एका रिकाम्या रेल्वे डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म लाईनपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या या रिकाम्या बोगीत आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास हजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म लाईनपासून दूर उभ्या असलेल्या रिकाम्या डब्यातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत अग्निशमन दल व संबंधित यंत्रणांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. रेल्वे प्रशासनाने अवघ्या 45 मिनिटांत म्हणजे सकाळी 6.45 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने आग लागलेला डबा रिकामा असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा प्रव...
तापत्या उन्हातही रंगांची उधळण… लिंबगाव रस्त्यालगत बहरलेला गुलमोहर ! 

तापत्या उन्हातही रंगांची उधळण… लिंबगाव रस्त्यालगत बहरलेला गुलमोहर ! 

महाराष्ट्र
नांदेड| शहरालगतच्या लिंबगाव रस्त्याच्या कडेला दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलमोहराने आपला लालभडक साज चढवला आहे. उन्हाच्या तीव्र झळा, रखरखते रस्ते आणि कोरडी धरती… अशा वातावरणातही हा वृक्ष जणू निसर्गाचा उत्सवच साजरा करताना दिसतो. गुलमोहराचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत त्याचा होणारा बहर. मार्च ते जून या कालावधीत पानांपेक्षा फुलांनी भरलेला हा वृक्ष निसर्गप्रेमींना आणि छायाचित्रकारांना नेहमीच आकर्षित करतो. लाल, केशरी आणि पिवळ्या छटांचा हा फुलांचा वर्षाव जणू आकाशाशी संवाद साधत असतो. ऋतू बदलतात… दरवर्षी तेच उन्हाळे, तेच रस्ते, तेच वृक्ष… पण प्रत्येक ऋतूत निसर्ग काहीतरी नवीन सांगत असतो. तो बदल शोधण्याचा प्रयत्न माझा कॅमेरा सातत्याने करत असतो. सारखेपणातला वेगळेपणा, कोरडेपणातली रंगांची चाहूल आणि शांततेतली जीवनाची धडपड — हे सारे माझा कॅमेरा टिपत राहतो. गुलमोहराचा हा बहर म्हणजे केवळ ...
तांडा वस्ती सुधार योजनेतील कामात अनियमिततेचा आरोप; बळीराम तांडा येथील नागरिकांची चौकशीची मागणी

तांडा वस्ती सुधार योजनेतील कामात अनियमिततेचा आरोप; बळीराम तांडा येथील नागरिकांची चौकशीची मागणी

महाराष्ट्र
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बळीराम तांडा व पोटा तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व नाली बांधकामात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कामांची गुणवत्तापूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती, हिमायतनगरचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार, पोटा तांडा येथे सि.सी. रस्ता व नाली बांधकामासाठी ७ लाख रुपये, तर बळीराम तांडा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख रुपये असा एकूण १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पोटा तांड्यातील सि.सी. रस्ता बांधकामात नाल्याची माती मिसळून काम सुरू असल्याचा आरोप असून, आवश्यक प्रमाणात...
हिमायतनगर तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट; पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत

हिमायतनगर तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट; पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर होत असून, याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर असताना ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि मशागतीची कामे डिझेलअभावी ठप्प होण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता डिझेल टंचाईचे नवे आव्हान उभे राहिले आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना आवश्यक इंधन उपलब्ध होत नसल्याने अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. याबाबत युवा शेतकरी श्रीदत्त पवार पाटील सोनारीकर यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधत डिझेल पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “बळीराजा जगला तरच देश जगेल,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सोशल मीडिया...
हिमायतनगर रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या उंबरठ्यावर; मात्र प्रवासी सुविधांतील त्रुटींमुळे नाराजी

हिमायतनगर रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या उंबरठ्यावर; मात्र प्रवासी सुविधांतील त्रुटींमुळे नाराजी

महाराष्ट्र, तेलंगणा
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उद्घाटनाची तारीखही जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्थानकावरील विविध विकासकामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून, उद्घाटनापूर्वीच अपूर्ण सुविधा पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. सध्या रेल्वे स्थानक परिसरात विद्युत रोषणाईसह सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्थानकावर ऍडव्हर्टीसिंग एलईडी टीव्ही, दोन नंबर प्लॅटफॉर्मवरील डिजिटल कोच डिस्प्ले, आरपीएफ अथवा जीआरपीएफ पोलीस चौकी, पार्सल कार्यालय, धनबाद एक्सप्रेसला थांबा, बंद झालेली काझीपेठ एक्सप्रेस चालू करावी. हिमायतनग...
तहसीलदार निवासस्थानाचा गोंधळ: दोन वर्षे उलटली, पण बिलोलीत अजूनही ‘जागा’च नाही!

तहसीलदार निवासस्थानाचा गोंधळ: दोन वर्षे उलटली, पण बिलोलीत अजूनही ‘जागा’च नाही!

महाराष्ट्र
पाऊण कोटींचा निधी मंजूर; प्रशासनाच्या अनास्थेवर प्रश्नचिन्ह बिलोली, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचा प्रश्न गेल्या जवळपास दोन वर्षांपासून अक्षरशः ठप्प अवस्थेत आहे. शासनाने पाऊण कोटींचा निधी मंजूर करून कार्यारंभ आदेशही दिला, मात्र अद्याप बांधकामासाठी जागाच उपलब्ध करून दिली नसल्याने हा प्रकल्प कागदोपत्रीच अडकून पडल्याचे वास्तव समोर आले आहे. २० जून २०२४ रोजी तहसीलदार निवासस्थानासाठी सुमारे ७५ लाख १८ हजार ८७९ रुपये निधी मंजूर करून वर्क ऑर्डर देण्यात आली होती. परंतु तब्बल तेविस महिने उलटूनही महसूल विभागाने संबंधित ठेकेदाराला बांधकामासाठी जागा दाखवलेली नाही. त्यामुळे निधी मंजूर, प्रक्रिया पूर्ण, आदेश जारी—सगळे काही असूनही प्रत्यक्षात एकही विटा रचली गेली नाही, ही बाब धक्कादायक ठरत आहे. ‘जागा नाही’ की ‘इच्छाच नाही’?...
राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी

माहिती
छत्रपती संभाजीनगर| समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव यांच्या मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा शनिवार, 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.   परीक्षेसंदर्भातील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल संकेतस्थळ⁠ https://www.maharashtrasrpf.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), गेट क्रमांक 01, 03, 05 व 08, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर, चाटे स्कूल, गट क्रमांक 98, रेणुका माता मंदिर रोड, बीड बायपास, सातारा परिसर तसेच एंजल स्कूल, सातारा परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.   उमेदव...
error: Content is protected !!