‘शब्द शब्द तुझाच आहे…’ कवितासंग्रहाचा ७ जून रोजी नांदेडमध्ये प्रकाशन सोहळा

राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड येथील वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे…’ या बहुचर्चित कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. पूर्णामलजी लाहोटी सभागृह, सायन्स कॉलेज, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

या साहित्यिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठी कवी, साहित्यिक व व्याख्याते इंद्रजीत भालेराव हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व कर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त अभिजित राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय प्रमुख उपस्थिती म्हणून स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख रामकृष्ण सोलंके आणि ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलापूरकर उपस्थित राहणार आहेत.

प्रेम, विरह, आईची माया, नात्यांची कोमलता आणि आयुष्यातील भावविश्व अत्यंत साध्या, सहज आणि हृदयस्पर्शी शब्दांत उलगडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहातून करण्यात आला आहे. विशेषतः तरुणाईच्या भावना आणि सामान्य माणसाच्या मनातील न बोललेले भाव कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होत असल्याने साहित्यप्रेमींमध्ये या संग्रहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई निर्मित या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथाली प्रकाशननिलेश वसंतराव शेवाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!