महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ अभियान सुरू

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ अभियान सुरू

महाराष्ट्र
राज्यातील सुमारे 9.86 कोटी मतदारांच्या नोंदींची होणार प्रत्यक्ष पडताळणी नांदेड| भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरातील मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision) करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्राचा या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वी देशात 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि 2002-04 या कालावधीत विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. मागील 20 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण झाले असून मोठ्या प्रमाणात स्थलांतर, नव्या नोंदी आणि वगळण्या झाल्याने मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव समाव...
खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

शेती
अफवांवर विश्वास ठेवू नका; गरजेनुसारच खत खरेदी करा – कृषी विभागाचे आवाहन नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार तसेच पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार खतांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. खत उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्यास, जादा दराने विक्री, खतासोबत अन्य वस्तूंची सक्ती (लिंकिंग) किंवा बोगस खतांची विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामात खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी निविष्ठा मानली जाते. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून खत नियोजन केले जाते. नांदेड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 मध्ये सुमारे 2 ...
हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

शेती
कागदावर शिबिरे, प्रत्यक्षात शेतकरी अंधारात; लाखोंच्या निधीच्या खर्चावर संशय, वामनराव पाटील वडगांवकर यांनी केली चौकशीची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| एकीकडे शासन “शेतकरी समृद्धी”चे गोडवे गात असताना दुसरीकडे हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या कथित निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच अडचणीत सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी तहसीलदार व संबंधित कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना पीक नियोजन, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व शासन योजनांबाबत मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. मात्र, मागील तीन वर्षांत हिमायतनगर शहरात एकही प्रभावी कृषी कार्यशाळा किंवा मार्गदर्शन शिबिर न झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाकडून खरीप ...
हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

शेती, राजकारण
स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्...
खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

शेती
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार; “धमक्यांना भीक घालणार नाही” वामनराव पाटील वडगांवकर  हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील खत टंचाई, काळाबाजार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच हिमायतनगरातील काही कृषी दुकानदार व दलालांकडून धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप समोर करण्यात आला आहे. खताचे पार्सल बाहेर जात असल्याचे फोटो काढल्याच्या कारणावरून काही दलालांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला असून, अशी पोस्ट सोशल मीडियावर वामनराव पाटील वडगांवकर यांनी व्हायरल केली आहे. याप्रकरणी शेतकरी हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा कोणत्याही धमकीला घाबरणारा नाही,” असा इशारा दिला आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किंवा काळाबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांनी “आपल्या औकातीत राहा...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर; बिलोली शहराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर; बिलोली शहराच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

महाराष्ट्र
बिलोली,गोविंद मुंडकर| बिलोली शहराच्या भविष्यातील विकासाला गती मिळावी, वाहतुकीची समस्या कमी व्हावी आणि व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी या उद्देशाने बिलोलीतील सामाजिक व राजकीय स्तरावरून पुन्हा एकदा महामार्ग आणि चेकपोस्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामुळे या विषयाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे. माजी नगराध्यक्ष विजयकुमार वेंकटेश कुंचनवार आणि नांदेड जिल्हा उद्योग आघाडी (ग्रामीण भाजप) चे उपाध्यक्ष भागवत मनोहरराव लोकमनवार यांनी संयुक्तपणे हे निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दोन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शिरूर ताजबंद – केंद्रकुर्ती महामार्ग बिलोलीमार्गे न्यावा - निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेला एनएच-१६१बीबी हा शिरूर ताजबंद ते केंद्रकुर्ती म...
समाजाच्या एकजुटीतच प्रगतीचा मार्ग; तेलंगणा–महाराष्ट्र संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन

समाजाच्या एकजुटीतच प्रगतीचा मार्ग; तेलंगणा–महाराष्ट्र संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन

महाराष्ट्र, तेलंगणा
बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी व माला दासरी समाज एकच; शासन लाभांसाठी मजबूत संघटना उभारण्यावर भर भोकर/हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| “समाज संघटना मजबूत असेल तरच समाजाला न्याय, दिशा आणि प्रगती मिळू शकते. आपसातील मतभेद विसरून समाजाच्या व भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन निझामाबाद बुक्कायावारू संगमचे अध्यक्ष रमेश सादुल्ला यांनी केले. ते तेलंगणा–महाराष्ट्र, दासरी, माला दासरी, बुक्का आयावरू व आय्यावरू समाज संघटनेची भोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी बोलताना रमेश सादुल्ला यांनी सांगितले की, शासनाच्या मागील जनगणनेतील त्रुटींमुळे अल्पसंख्यांक समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या प्रवर्गात विभागले गेले आहेत. प्रत्यक्षात बुक्का आयावरू, आय्यावरू, दासरी आणि माला दासरी समाज हा एकच असून व्यवसाय, कुलदैवत तसेच रोटी-बेटी ...
मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा; सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा; सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

शेती
छत्रपती संभाजीनगर| आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश G. Srikant यांनी दिले. विभागीय आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शहरी आणि ग्रामीण भागातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी सुरक्षित ठिक...
राज्यभर विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम सुरू

राज्यभर विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहीम सुरू

महाराष्ट्र
मुंबई| भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती S. Chockalingam यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करणार आहेत. पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांची माहिती पडताळण्यात येणार असून नाव, पत्ता, फोटो किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अनुपस्थित, स्थला...
केंद्रीय जनगणना पथकाची लोहा तालुक्यातील कामकाजाची पाहणी;

केंद्रीय जनगणना पथकाची लोहा तालुक्यातील कामकाजाची पाहणी;

महाराष्ट्र
तहसीलदार व टीमच्या नियोजनाला शाबासकी प्रगणक शिक्षक एल. जी. वाघमारे यांचे काम पूर्ण; केंद्रीय पथकाकडून सत्कार लोहा | लोहा तालुक्यात सुरू असलेल्या जनगणना 2027 च्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जनगणना पथकाने शुक्रवारी (दि. 22 मे) तहसील कार्यालयाला भेट देत ग्रामीण व शहरी भागातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे तसेच जनगणनेच्या प्रगतीचे कौतुक करत केंद्रीय पथकाने त्यांच्या टीमला शाबासकी दिली. केंद्रीय पथकात जनगणना सहसंचालक श्री शर्मा, सहाय्यक संचालक श्री पांडे, बी. प्रसाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जनगणना कक्षाचे सहायक लतीफ पठाण यांचा समावेश होता. पथकाने ग्रामीण व शहरी भागातील पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात बैठक घेऊन जनगणनेच्या कामाचा आढावा घेतला. लोहा तालुक्यात ग्रामीण जनगणना कामासाठी 64 पर्यवेक्षक आणि 359 ...
error: Content is protected !!