महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिमायतनगरच्या एकंबा भागात लांडग्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

हिमायतनगरच्या एकंबा भागात लांडग्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

शेती
हिमायतनगर, प्रतिनिधी | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या एकंबा शिवारात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची धक्कादायक घटना दिनांक 8 जून रोजी उघडकीस आली आहे. शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन वासरांवर वन्य प्राण्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एका वासराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे वासरू गंभीर जखमी होऊन नंतर मृत झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास शेतकरी शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. एकंबा शिवारातील शेतकरी सुनील सुभाष पिट्लेवाड व आकाश विठ्ठल पिट्लेवाड यांच्या शेतसर्वे नंबर 28 व 29 मधील आखाड्यावर बांधलेल्या वासरांवर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला लांडग...
खत टंचाईवरून हिमायतनगरात शेतकऱ्यांचा संताप; कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

खत टंचाईवरून हिमायतनगरात शेतकऱ्यांचा संताप; कृषी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

राजकारण, शेती
स्थानिक शेतकऱ्यांना खत नाकारून बाहेरील लोकांना पुरवठ्याचा आरोप; कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात खत टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, खत वितरणातील कथित अनियमितते विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. तालुक्यातील कृषी दुकानदार आणि कृषी विभागाच्या संगनमतातून स्थानिक शेतकऱ्यांना खतापासून वंचित ठेवून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केला आहे. या निषेधार्थ सोमवारी (दि. ८ जून) रोजी हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर वामनराव पाटील वडगावकर यांनी तब्बल तासभर अर्धनग्न आंदोलन करत कृषी विभाग व खत विक्रेत्यांच्या कथित मनमानी कारभाराचा जाब विचारला. या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणा...
सरसमजवळील भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर संताप

सरसमजवळील भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर संताप

महाराष्ट्र
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागावर नागरिकांची नाराजी हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम नजीक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “रस्ता रुंद झाला, पण अपघातांचे सत्र कधी थांबणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, महामार्ग रुंदीकरणानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अद्याप अपुऱ्या आहेत. परिणामी, वारंवार अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी वेदना मांडत म्हटले आहे की, या रस...
‘शब्द शब्द तुझाच आहे…’ कवितासंग्रहाचा ७ जून रोजी नांदेडमध्ये प्रकाशन सोहळा

‘शब्द शब्द तुझाच आहे…’ कवितासंग्रहाचा ७ जून रोजी नांदेडमध्ये प्रकाशन सोहळा

महाराष्ट्र
राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन नांदेड, प्रतिनिधी| नांदेड येथील वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे…’ या बहुचर्चित कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. पूर्णामलजी लाहोटी सभागृह, सायन्स कॉलेज, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या साहित्यिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मराठी कवी, साहित्यिक व व्याख्याते इंद्रजीत भालेराव हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, छत्रपती संभाजीनगर येथील वस्तू व कर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त अभिजित राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय प्रमुख उपस्थिती म्हणून स्वारातीम विद्या...
नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

शेती
5 व 8 जून रोजी वादळी वारे, मेघगर्जना आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन नांदेड | नांदेड जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामानाचा जोरदार बदल पाहायला मिळण्याची शक्यता असून, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जिल्ह्यासाठी 5 जून व 8 जून 2026 रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 5 जून रोजी दुपारी 12:38 वाजता जारी करण्यात आलेल्या हवामान सूचनेनुसार, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वातावरण अचानक बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वादळी हवामानात काय काळजी घ्याल? हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत...
खतांच्या जादा दराला लगाम; हिमायतनगर कृषी विभागाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा

खतांच्या जादा दराला लगाम; हिमायतनगर कृषी विभागाच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा

शेती, स्थानिक
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठपुरावा युरिया ₹266 तर डीएपी ₹1350 दराने उपलब्ध करण्याचे आदेश शेतकऱ्याकडून जादा वसुली सहन केली जाणार नाही हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात खतांच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असताना कृषी विभागाने बुधवारी अखेर हस्तक्षेप करत विक्रेत्यांना शासनाने निश्चित केलेल्या दराने खत विक्री करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती. दि. ३ जून बुधवारी रोजी सकाळपासून अनेक शेतकऱ्यांनी खतांच्या जादा दराबाबत तक्रारी केल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खत विक्रेत्यांशी बैठक घेऊन शासनमान्य दराने खत उपलब्ध क...
दुर्गराज रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळणार; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य जय्यत तयारी

दुर्गराज रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळणार; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य जय्यत तयारी

महाराष्ट्र
५ ते ७ लाख शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता; नांदेड जिल्ह्यातून ३ हजारांहून अधिक शिवप्रेमी रायगडकडे रवाना होणार – माधवराव देवसरकर नांदेड, प्रतिनिधी| छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णक्षणांची ऐतिहासिक आठवण जागवणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा यंदाही दुर्गराज रायगडावर दिमाखात साजरा होणार असून, देशभरातून लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीने रायगड भगवामय होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जून रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा भव्य उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती समितीचे सदस्य माधवराव देवसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी यंदा देशभरातून तब्बल ५ ते ७ लाख शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक, पर्यटक आणि शिवप्रेमी रायगडावर...
नांदेडात पद्मशाली समाज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

नांदेडात पद्मशाली समाज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र
६ सप्टेंबरला राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याची घोषणा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप नांदेड, प्रतिनिधी| अखिल भारतीय पद्मशाली संघम, हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभेअंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ, युवक व महिला संघटनेचा कार्यकारिणी विस्तार व प्रबोधन मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. भर उन्हाची व उकाड्याची तमा न बाळगता जिल्हाभरातून समाजबांधव, महिला व युवकांनी विक्रमी उपस्थिती लावत समाज एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले. या मेळाव्यात समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजबांधव व पालकांच्या मागणीचा आदर करत येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा (नांदेड) येथे राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची अध...
₹4 हजार द्या… मगच पाणी कनेक्शन घ्या?” — हिमायतनगरात नळजोडणीवर विना पावती वसुलीचा आरोप

₹4 हजार द्या… मगच पाणी कनेक्शन घ्या?” — हिमायतनगरात नळजोडणीवर विना पावती वसुलीचा आरोप

महाराष्ट्र
पाणीपुरवठा योजना जनतेसाठी की ठेकेदार–पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी? नागरिकांमध्ये संताप; ₹22 लाखांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात नव्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरगुती नळ कनेक्शन देताना प्रत्येक लाभार्थ्याकडून तब्बल ₹4,000 रोख रक्कम घेतली जात असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, रक्कम भरल्याशिवाय खोदकाम, जोडणी अथवा पुढील प्रक्रिया होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाची पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी आहे की काहींच्या आर्थिक फायद्यासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुमारे सात–आठ वर्षांपूर्वी 19 कोटींपेक्षा अधिक निधीची नळयोजना मंजूर करण्यात आली होती. मात्र कामाच्या संथ गतीमुळे आणि दर्जाबाबत यापूर्वी झालेल्या आरोपांमुळे ही योजना अनेकदा चर्चेत राहिली. एवढा...
सोनारी फाट्यावरील टोलनाक्यावर सुविधांचा अभाव; भेगाळलेल्या रस्त्यावर वसुली सुरू असल्याने संताप

सोनारी फाट्यावरील टोलनाक्यावर सुविधांचा अभाव; भेगाळलेल्या रस्त्यावर वसुली सुरू असल्याने संताप

महाराष्ट्र
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय कुलूपबंद; नियम धाब्यावर बसवून टोलवसुलीचा आरोप हिमायतनगर | हिमायतनगर–भोकर मार्गावरील सोनारी फाट्याजवळ सुरू करण्यात आलेल्या टोलनाक्यावर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, रस्त्याची दयनीय अवस्था असतानाही टोलवसुली मात्र जोमाने सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टोलनाक्यावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर शौचालयाला कुलूप लावलेले असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय, भोकर–हिमायतनगर अंतर्गत सिमेंट रस्त्यावर जागोजागी भेगा व खड्डे पडले असूनही टोल आकारला जात असल्याचा आरोप होत आहे. “रस्ता खराब, सुविधा गायब... मग टोल कशासाठी?” नागरिकांचा सवाल आहे की, रस्त्याची दुरवस्था, पाणीटंचाई, शौचालय सुविधा बं...
error: Content is protected !!