महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरील निर्बंध मागे; पारंपरिक पूजेस हिरवा कंदील

महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरील निर्बंध मागे; पारंपरिक पूजेस हिरवा कंदील

महाराष्ट्र
पुणे | पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर घालण्यात आलेले निर्बंध राज्य शासनाने मागे घेतले असून, यापुढे पूर्वीप्रमाणे वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक वटपूजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने सादर करून निर्बंध मागे घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून महात्मा फुले वाडा राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वीपासून सुरू असलेल्या परंपरा आणि चा...
शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेती
१५ जुलैपासून राज्यभर मोहिमेला प्रारंभ; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड | सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षांत ई-पीक पाहणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून पीक पाहणीची जबाबदारी थेट शासन नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे. ई-पीक पाहणी ही शासकीय योजना, पीक कर्ज, पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पिकांची अचूक नोंद असल्यास शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते. नवीन निर्णयानुसार तहसीलदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी...
खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

शेती
शेतकऱ्यांना शास्त्रोक्त नियोजनाचे आवाहन; बीज उगवण चाचणी व बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला नांदेड | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल, असे त्यांनी सांगितले. हवामानातील सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. बियाण्यांची उगवण क्षमत...
नांदेड जिल्ह्यास चार दिवसांचा येलो अलर्ट; २५ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा

नांदेड जिल्ह्यास चार दिवसांचा येलो अलर्ट; २५ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्र
नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दि. २४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता जारी केलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. २४ ते २७ जून २०२६ या कालावधीत येलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. २४, २६ व २७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. २५ जून रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटावेळी घ्यावयाची खबरदारी वादळी पाऊस व ...
एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

शेती
कमी पावसाच्या शक्यतेमुळे पीक नियोजन, आंतरपीक आणि जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन नांदेड | यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मुख्य पिकांची पेरणी टाळावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करणे सुरक्षित ठरेल. अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो. सोयाबीन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना वाढते उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच...
पात्र शेतकऱ्यांनी आधार-अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी

पात्र शेतकऱ्यांनी आधार-अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी

शेती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रशासनाचे आवाहन नांदेड | राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईलशी संलग्न करून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना लागू केली असून, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर...
पेरणीपूर्वी बियाण्यांची चाचणी करा; दुबार पेरणीचे संकट टाळा

पेरणीपूर्वी बियाण्यांची चाचणी करा; दुबार पेरणीचे संकट टाळा

शेती
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन, उगवण क्षमता तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी घरचे किंवा बाजारातून खरेदी केलेले बियाणे थेट पेरणीसाठी न वापरता त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कमी पाऊस, बदलते हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता एकदाच योग्य पेरणी होणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट किंवा कमी उगवणक्षम बियाण्यामुळे रोपांची संख्या घटते, दुबार पेरणीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी साध्या पद्धतीने बियाण्यांची चाचणी करून त्यांचा दर्जा निश्चित करावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे. गोण...
हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

क्रीडा
योगाभ्यासातून निरोगी जीवनाचा संदेश; विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हिमायतनगर | केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या निर्देशानुसार शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात रविवारी (दि. 21 जून) 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम यांनी योग प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देताना डॉ. कदम यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, धनुरासन, भुजंगासन यांसह विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ...
मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

शेती
पेरणीची कामे रखडली : शेतकरी चिंतेत पाणीपातळी खालावण्यास सुरुवात : पशू-पक्ष्यांनाही फटका आभाळात ढगांची गर्दी, पण वरुणराजाची प्रतीक्षा अद्याप कायम हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागून तब्बल १५ दिवस उलटले तरी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून पेरणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. रविवार (दि. २१) पासून वातावरणात काहीसा बदल जाणवू लागला आहे. काही भागांत थंड तर काही ठिकाणी उष्ण वारे वाहत असून आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत आहे. सायंकाळच्या वेळी आभाळ दाटून येत असले तरी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे "केव्हा बरसणार वरुणराजा?" हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला सतावत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत पूर्ण करून...
नाव परिवर्तन जाहिरात देयकांचा घोळ; दोन वर्षांपासून शेकडो बिले प्रलंबित असल्याचा आरोप

नाव परिवर्तन जाहिरात देयकांचा घोळ; दोन वर्षांपासून शेकडो बिले प्रलंबित असल्याचा आरोप

महाराष्ट्र
नवीन नांदेड | सिडको क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नाव परिवर्तन जाहिरातींच्या देयकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विविध दैनिके, साप्ताहिके आणि पाक्षिकांची शेकडो देयके गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तात्काळ देयके लेखा विभागाकडे सादर करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाव परिवर्तन प्रक्रियेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींची बिले संबंधित वृत्तपत्रांनी नियमानुसार तीन प्रतींसह सादर केली आहेत. ही बिले जावक विभागामार्फत स्वीकारण्यात आली असली, तरी ती पुढील प्रक्रियेसाठी वेळेत पाठविण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, गेल्या दोन वर्षांतील मोठ्या प्रमाणातील देयके रखडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, नाव परिवर्तन विभागात अनेक ...
error: Content is protected !!