कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

गोवंश तस्करीप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्पर सेवा; घटनास्थळी उपचार व नमुने संकलित

नांदेड, अनिल मादसवार| मौजे बोंढार तर्फे हवेली, ता. नांदेड परिसरात गोवंश तस्करी व कत्तलीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नांदेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव तरपेवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दि. १८ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत भूल देण्यात आलेल्या गोवंशावर डॉ. तरपेवाड यांनी तत्परतेने आवश्यक पशुवैद्यकीय उपचार केले. तसेच कत्तल करण्यात आलेल्या एका गोवंशाचे आवश्यक नमुने शास्त्रीय पद्धतीने संकलित करून पुढील तपासासाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. डॉ. राजीव तरपेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्यतत्परतेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!