Tag: नांदेड

नांदेड महापालिकेचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल

नांदेड महापालिकेचे गोदावरी प्रदूषण नियंत्रणासाठी मोठे पाऊल

सामाजिक
२२ प्रमुख नाल्यांतील सांडपाणी नदीत जाणे रोखण्यात यश; आयुक्त डॉ. डोईफोडे यांचा आढावा नांदेड | शहराची जीवनवाहिनी आणि धार्मिक दृष्ट्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध उपाययोजना प्रगतीपथावर असून, २२ प्रमुख नाल्यांमधून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष आढावा बैठक पार पडली. बैठकीत गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापालिकेने नदीकाठालगत ३.३ किलोमीटर लांबीची आणि १२०० मिमी व्यासाची मलवाहीनी उभारली असून, १७ इंटरसेप्ट स्ट्रक्चर्सद्वारे सांडपाणी अडवून ते मलशुद्धीकरण केंद्रांकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बोंढार, इलिचपूर, सांगवी आणि डंकीन ...
नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

शेती
5 व 8 जून रोजी वादळी वारे, मेघगर्जना आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन नांदेड | नांदेड जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामानाचा जोरदार बदल पाहायला मिळण्याची शक्यता असून, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जिल्ह्यासाठी 5 जून व 8 जून 2026 रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 5 जून रोजी दुपारी 12:38 वाजता जारी करण्यात आलेल्या हवामान सूचनेनुसार, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वातावरण अचानक बदलण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वादळी हवामानात काय काळजी घ्याल? हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत...
नांदेडात पद्मशाली समाज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

नांदेडात पद्मशाली समाज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र
६ सप्टेंबरला राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याची घोषणा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप नांदेड, प्रतिनिधी| अखिल भारतीय पद्मशाली संघम, हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभेअंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ, युवक व महिला संघटनेचा कार्यकारिणी विस्तार व प्रबोधन मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. भर उन्हाची व उकाड्याची तमा न बाळगता जिल्हाभरातून समाजबांधव, महिला व युवकांनी विक्रमी उपस्थिती लावत समाज एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले. या मेळाव्यात समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजबांधव व पालकांच्या मागणीचा आदर करत येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा (नांदेड) येथे राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची अध...
नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

शेती
कृषी विभागाची धडक कारवाई नांदेड| नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि चौकशीअंती कृषी विभाग यांनी कठोर कारवाई करत नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगाव यांचा समावेश आहे. याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता. मुदखेड, मे. व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार आणि मे. तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार यांच्या परवान्यांवरही सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मे. शिवकृपा कृषि विकास केंद्र, माळकौठा ता. मुदखेड आणि व्यंकटेश कृषि भांडार, नवीन मों...
नांदेडमध्ये अवैध शस्त्रांचा भलामोठा साठा जप्त

नांदेडमध्ये अवैध शस्त्रांचा भलामोठा साठा जप्त

क्राइम
ऑपरेशन क्रॅकडाऊनचा मोठा फटका! 703 घातक शस्त्रांसह 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत नांदेड | नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध शस्त्र तस्करीवर पोलिसांनी मोठा घाव घालत ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडाकेबाज कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून तब्बल 703 अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला असून, 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई उभी केली. मिळालेल्या माहितीनुसार, देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवर...
नांदेडच्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

नांदेडच्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील मुख्य मार्गांपैकी एक असलेल्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवून परिसर मोकळा करण्यात आला. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने प्रस्तावित असून भूमी अभिलेख विभागाने दिलेल्या रेखांकनानुसार महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचबरोबर नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रोडवरील मुख्य नैसर्गिक नाल्यावर झालेली अतिक्रमणेही हटवण्यात आली. बेकायदेशीर बांधकामांमुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याने परिसरात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महान...
नांदेड जिल्हा वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड

नांदेड जिल्हा वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड

करियर
गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांकडून सत्कार नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड झाल्याबद्दल गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अर्धापूरकर यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार नौनिहालसिंह जहागीरदार, सरदार नवज्योतसिंह जहागीरदार, सरदार कुलप्रकाशसिंह लिखारी, सरदार सतपालसिंह गिल, सरदार परविंदरसिंह शाहू, सरदार गणपतसिंह कामठेकर, सरदार हरमीतसिंह रागी, विष्णू वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी अँड. अर्धापूरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा अधिवक्ता संघाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्य...
नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व बॅनर्सवर कठोर कारवाई; संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंग्स व बॅनर्सवर कठोर कारवाई; संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

सामाजिक
नांदेड | नांदेड शहरातील वाढत्या अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनरबाजीवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. राज्य शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई राबविण्यात येणार असून, विनापरवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बैठकीस महापौर कविता संतोष मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी व्यंजने, प्रशांत शिंदे यांच्यासह उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, निलेश संकेवार, उपायुक्त अजितपालसि...
नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास उद्यापासून प्रारंभ

नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास उद्यापासून प्रारंभ

सामाजिक
नांदेड| भारतीय जनगणना 2027 अंतर्गत घर यादी व घर गणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, नांदेड अंतर्गत सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे अंतिम प्रशिक्षण शंकराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष जनगणना कार्यास उद्यापासून प्रारंभ होत असून प्रशासनाने त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः “मांडणी दर्शक नकाशा” अचूक पद्धतीने तयार करणे, गावातील प्रत्येक घराची नोंद करणे तसेच घरांची क्रमवारी आणि भौगोलिक मांडणी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. याशिवाय केंद्र शासनाच्या “HLO App” चा वापर करून डिजिटल पद्धतीने माहिती नोंदविणे, माहिती अपलोड करणे, स्वगणना आयडी तपासणे आणि ऑनलाइन प्रक्रियेमधील अडचणी सोडविणे याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले...
नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

सामाजिक
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३६२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, १५ मे रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा सेतू समितीच्या वतीने आयोजित या प्रक्रियेत अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यांतील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ मेपासून मुलाखत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत एकूण १२ स्वतंत्र मुलाखत कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ...
error: Content is protected !!