
कृषी विभागाची धडक कारवाई
नांदेड| नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि चौकशीअंती कृषी विभाग यांनी कठोर कारवाई करत नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.


निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगाव यांचा समावेश आहे.


याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता. मुदखेड, मे. व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार आणि मे. तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार यांच्या परवान्यांवरही सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


तसेच मे. शिवकृपा कृषि विकास केंद्र, माळकौठा ता. मुदखेड आणि व्यंकटेश कृषि भांडार, नवीन मोंढा, नांदेड यांच्या खत वाटपामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.


जिल्ह्यात कुठेही रासायनिक खतांची जादा दराने किंवा विनापरवाना विक्री होत असल्यास अथवा खते उपलब्ध असूनही विक्री न केल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
