नांदेड जिल्हा वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड

गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांकडून सत्कार

नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्हा अधिवक्ता संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. यदुपत अर्धापूरकर यांची निवड झाल्याबद्दल गुरुद्वारा मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अर्धापूरकर यांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला नवज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार नौनिहालसिंह जहागीरदार, सरदार नवज्योतसिंह जहागीरदार, सरदार कुलप्रकाशसिंह लिखारी, सरदार सतपालसिंह गिल, सरदार परविंदरसिंह शाहू, सरदार गणपतसिंह कामठेकर, सरदार हरमीतसिंह रागी, विष्णू वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी अँड. अर्धापूरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा अधिवक्ता संघाच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!