२२ ते २८ जुलैदरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

रक्तदानासह विविध मोफत आरोग्य तपासण्या; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी रक्तदान व महाआरोग्य शिबिर अभियानाचे आयोजन २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमध्ये विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि आयुष मुंबईचे आयुक्त तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरांचे वेळापत्रक  – रक्तदान शिबिर : २२ ते २८ जुलै — रक्तपेढी (ब्लड बँक), स्तन कर्करोग तपासणी : २२ ते २४ जुलै — ओपीडी क्र. १२३, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी : २५ ते २७ जुलै — ओपीडी क्र. ११८, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) व हाडांची तपासणी : २२ ते २४ जुलै — ओपीडी क्र. ११५, नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर : २२ ते २४ जुलै — ओपीडी क्र. १२१

या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा. तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!